नागपूर स्पेशल सांभार वडी (पाटोडी) (sambar vadi / patodi recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#दिवाळी_स्पेशल #सांभार_वडी #पाटोडी ....नागपूर ची स्पेशल सांभारवडी ..चटपटीत ,थोडी स्पायसी ...खूपच सूंदर झाली ....

नागपूर स्पेशल सांभार वडी (पाटोडी) (sambar vadi / patodi recipe in marathi)

#दिवाळी_स्पेशल #सांभार_वडी #पाटोडी ....नागपूर ची स्पेशल सांभारवडी ..चटपटीत ,थोडी स्पायसी ...खूपच सूंदर झाली ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलो कोथींबीर
  2. 300 ग्रामसूका खोबराकीस
  3. 4-5मीडीयम साईज कांदे
  4. 3-4हीरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनलसुन,अद्रक,हीरविमीर्ची पेस्ट..
  6. 1 टीस्पूनजीर
  7. 1 टीस्पूनतीखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनहींग
  12. 1 टीस्पूनमीठ
  13. 1/2 टीस्पूनसाखर
  14. 1 टेबलस्पूनगरममसाला
  15. 2 टेबलस्पूनसूकेमेवे काजू,कीसमीस
  16. 1 टेबलस्पूनतेल मसाला तयार करायला
  17. 500 ग्रामतेल तळणाला
  18. पारी साठी.
  19. 400 ग्रामबेसन
  20. 200 ग्राममैदा
  21. 1 टीस्पूनमीठ
  22. 1/2 टीस्पूनहळद
  23. 2 टेबलस्पूनतेल मोहन
  24. भीजवायला पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम कोथिंबीर (सांभार)तोडून स्वच्छ 2-3 वेळा धूवून पूर्ण पाणी काढून...कीचन टाँवेलवर पसरवून थोड हलकेच दाबून पाणी पूसून घेणे..नंतर ती बारीक चीरून घेणे...कांदा,मीर्ची,चाँपरमधे बारीक करणे...

  2. 2

    नंतर गँसवर कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून त्यात जीर,बारीक चीरलेली मीर्ची,कांदा टाकणे..परतणे नी हींग आणी लसूण, मीर्ची,अद्रक पेस्ट टाकणे..

  3. 3

    परतणे नी खोबराकीस टाकणे परतणे आणी सूके मेवे टाकणे 1 मींट परतणे....

  4. 4

    नंतर सगळे मसाले टाकून 1 मींट परतणे नी मीठ,साखर टाकून मीक्स करणे...

  5. 5

    नंतर कोथिंबीर (सांभार)चीरलेला टाकणे मीक्स करून 1 मींट परतून गँस बंद करणे सारण तयार...थंड होऊ देणे...

  6. 6

    आता पारी साठी मैदा,बेसन मोजून घेणे नी...हळद,मीठ,तेल टाकणे... मीक्स करून पाणी टाकून साधारण घट्टच कणीक भीजवून घेणे...

  7. 7

    15 मींट झाकून ठेवणे नंतर त्याचे सारखे गोळे करून घेणे..नी एक गोळा घेऊन त्याची साधारण पातळ पोळी लाटणे...

  8. 8

    नी त्यावर थोड तेल,गरम मसाला लावणे नी त्यावर तयार सारण मधे लांबित ठेवणे आणी साईडनी थोड पाण्याच बोट फीरवणे....

  9. 9

    आणी त्याची दोन्ही बाजू एकावर एक दूमडून घडी करणे साईडपण बंद करणे नी गँसवरील गरम तेलात टाकणे नी गँस मीडीयम ते लो करणे...

  10. 10

    आणी स्लो फ्लेमवर जरा लालसर कूरकूरीत तळून घेणे...सगळ्या अशाच तयार करून घेणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes