बुंदीचे लाडू.. (boondi ladoo recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ

बुंदीचे लाडू.. (boondi ladoo recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळीफराळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4व्यक्ती साठी
  1. 2 ग्लासबेसन
  2. 1/4 ग्लास पाणी
  3. तळण्यासाठी तेल / तूप
  4. 7-8काजू-बदामाचे काप
  5. 1 टेबलस्पूनविलायची पावडर
  6. 1 पिंचखाण्याचा हिरवा, लाल रंग (ऑप्शनल)
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 2 ग्लाससाखर
  9. सव्वा
  10. ग्लासपाणी (कमी जास्त होऊ शकते)
  11. 8-10केशरकाडया

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    चाळनीने बेसन चाळून घ्या. नंतर त्यामध्ये चार ते पाच टेबलस्पून तूप किंवा तेल, हाफ टेबलस्पून मीठ व आवश्यकतेनुसार पाणी हळू हळू मिक्स करा. (आपले बॅटर एकदम पातळ ही नको आणि एकदम घट्टसर पण नको. फोटो दाखविले तसे) भिजवलेले बॅटर दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

  2. 2

    भिजवलेल्या बेसनामधून दोन वाट्यांमध्ये थोडे थोडे बेसन काढून घ्या. त्यापैकी एका वाटीमध्ये लाल रंग दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा रंग घालून बॅटर तयार करून घ्या. कलर ची बूंदी तयार करण्यासाठी.

  3. 3

    एका पसरट भांड्यामध्ये साखर घेऊन त्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एक तारी पाक तयार करून घ्या. व त्यात रंग येण्यासाठी केशर काड्या घाला.

  4. 4

    कढईत बुंदी तळण्यासाठी तेल घाला. तेल चांगले गरम झाले की, त्यामध्ये बेसनाची बुंदी पाडण्यासाठी झार्यावर बेसन पीठ घेऊन ते वाटीने अलगत फिरवून गोल गोल बुंदी तळून घ्यावी. (बुंदी पाडल्यानंतर झार्या लगेच पाण्याने धुऊन घ्यावा. असे केल्याने पुढची बुंदी छान गोल गोल गोल पाडण्यासाठी मदत होते)

  5. 5

    अशाच प्रकारे सर्व बुंदी तळून घ्या.

  6. 6

    हिरवा कलर घातलेल्या बेसना पासून बुंदी तयार करून घ्या. तसेच लाल कलरची देखील बुंदी तयार करून घ्या

  7. 7

    तिन्ही कलरच्या बुंदि एकत्र करून, थोड्या थंड करून घ्या.

  8. 8

    आताही तळलेली बुंदी साखरेच्या पाकामध्ये घालून, त्यात दोन ते तीन चमचे तूप, विलायची पावडर घालून चांगले मिक्स करून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. म्हणजे बुंदी पाक शोषून घेईल व आपले लाडू व्यवस्थित बांधल्या जातील.

  9. 9

    अर्ध्या तासानंतर बुंदीचे सर्व लाडू वळून घ्या. तयार आहेत आपले बुंदीचे लाडू.....
    तेव्हा नक्की ट्राय करा.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes