ग्रील्ड भाज्या (Grilled Vegetables recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week15 की वर्ड-- Grill
Grill या की वर्डच्या निमित्ताने आज भाज्या grill करुन बघायला मिळाल्या..नाहीतर ही रेसिपी कधी घरी करायची हा डोक्याबाहेरचा विषय..उगाच आपलं जमेल की नाही..हीच चिंता..म्हणून मग घरी नकोच..बाहेर हॉटेल मध्येच खायचे हे सगळे fancy items..तरी पण दरवेळी वेगवेगळे vdo मात्र न चुकता बघायचे. याचं म्हणजे असं झालं दिवसभर बिर्याणी ,पुलाव च्या रेसिपीज बघायच्याआणि रात्री शेवटी खिचडीच करायची ..यावेळी की वर्ड बघितला आणि म्हटलं करुन बघू या का..Grill ची सगळी शस्त्र म्हणजे skewer वगैरे कधीच खरेदी करून ठेवले होते..हो. ना चाललं होतं..आज भाजीवाल्याने सगळ्या प्रकारच्या ताज्या ताज्या भाज्या आणून दिल्या होत्या..मग जरा मनाने उचल खाल्ली आणि कधीही न बनवलेली रेसिपी मी करुन बघितली..आणि super duper fantastic झाली की हो..म्हणजे जमणार नाही,बिघडेल या एकतर अंधश्रद्धा तरी आहेत किंवा अफवा आहेत..असो..चला तर मग माझी बहुप्रतिक्षित असलेली Grilled Vegetables या रेसिपीने "अब आया मेरा नंबर "असं म्हणत अगदी आनंदात ख्रिसमस celebrate केलाय full on party mood मध्ये..😊😊 रेसिपी पाहू या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 40 मिनिटे
5 जणांना
  1. 3बटाटे मोठे तुकडे
  2. 7-8फ्लॉवरचे तुरे
  3. 7-8ब्रोकोलीचे तुरे
  4. 3टोमॅटो मोठे तुकडे करून
  5. 2कांदे मोठे तुकडे करून
  6. 1काकडी मोठे तुकडे करून
  7. 1/2हिरवी सिमला मिरची
  8. 1/2लाल सिमला मिरची
  9. 1/2पिवळी सिमला मिरची
  10. 1गाजर मोठे तुकडे करून
  11. 2वांगी मोठे तुकडे करून
  12. 1मक्याचे कणीस मोठे तुकडे करून
  13. मँरिनेशन साठी मसाला
  14. 2 टीस्पूनतिखट
  15. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  16. 1 टीस्पूनजीरे पावडर
  17. 1 टीस्पूनबडीशेप पावडर
  18. 1 टीस्पूनमिक्स हर्ब
  19. 1मोठ्या लिंबाचा रस
  20. सैंधव मीठ चवीनुसार
  21. गार्लिक बटर
  22. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे फ्लावर ब्रोकोली मक्याचे कणीस पाण्यात घालून अर्धवट शिजवून घ्यावेत.गार करावेत.

  2. 2

    तोपर्यंत इकडे लिंबूरस आणि बटर सोडून मँरिनेशनचा मसाला तयार करून घ्यावा.

  3. 3

    आता एका मोठ्या वाटी मध्ये गार झालेल्या भाज्या आणि राहिलेल्या साहित्यामधील भाज्या एकत्र कराव्यात.

  4. 4

    आता या भाज्यांवर सगळा मसाला,लिंबूरस चांगला चोळून दहा पंधरा मिनीटे तसेच ठेवून द्यावे.मग skewer वर सगळ्या भाज्या arrange करुन ठेवाव्यात.

  5. 5

    नंतर तव्यावर गार्लिक बटर टाकून skewer फिरवत फिरवत सगळ्या भाज्या grill करुन घ्या.तयार झाल्या आपल्या ग्रिल्ड व्हेजिटेबल्स.

  6. 6

    अशा रीतीने तयार झालेल्या grilled vegetables डिश मध्ये काढून लिंबू हिरवी चटणी यासोबत सर्व्ह करा..

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes