नवरत्न शाही पुलाव (navratna shahi pulav recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK19
#Keyword_Pulao

"नवरत्न शाही पुलाव"

खरेखुरे रत्न तर मी सगळे काही बघीतले नाहीत.. आणि जास्त माहिती पण नाही...
पण स्वैयंपाक घरातील रत्नांची खुप सारी माहिती सांगु शकेल...

रत्न म्हणजे अनमोल, यापासून खुप सारे फायदे..जसे की काजू ,बदाम, पिस्ता, अक्रोड, वेलची दालचिनी,काळेमीरे, मसाला वेलची, लवंग,तेजपत्ता, अंजीर,शहाजीरे असे अनेक जिन्नस आहेत .ते आपल्या शरिरासाठी, आरोग्यासाठी कधी ना कधी उपयुक्त ठरतात...हे सुद्धा आपल्यासाठी रत्नांपेक्षा कमी नाहीत.
पुर्वी शहेनशहा अकबर च्या भरजरी कोटाला नऊ रत्ने होती.. आणि मग सगळेच राजे नवरत्न असलेले कोट वापरु लागले.. असं मी ऐकुन आहे.. म्हणजेच ज्याने रत्न परिधान केले तो खुप मोठा, श्रीमंत असं..

या पुलावमध्ये असेच नऊ भारी भारी रत्न आहेत, म्हणून मी याला "नवरत्न शाही पुलाव" असे नाव दिले आहे..
तर अशा या सर्व रत्न परिधान केलेल्या आणि खुप श्रीमंत अशा पुलाव ची रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयारीसाठी वीस मिनिटे आणि शिजवण्यासाठी वीस मिनिटे
चार
  1. 1 कपबासमती तांदुळ
  2. 4 टेबलस्पूनतूप
  3. 1/4 कपकाजू
  4. 1/4 कपबदाम
  5. 1/4 कपमनुका
  6. 1/4 कपअक्रोड
  7. 1/4 कपपनीर चे पीस
  8. 1/4 कपगाजर कापून
  9. 1/4 कपफरसबी कापून
  10. 1/4 कपबटाट्याचे तुकडे
  11. 1/4 कपसिमला मिरची कापून
  12. 4हिरवी वेलची
  13. 1मसाला वेलची
  14. 4काळे मिरे
  15. 2तेजपत्ता पाने
  16. 1दालचिनी तुकडा
  17. 1/4 कपफ्लाॅवर बारीक तुकडे करून
  18. 1 टेबलस्पूनकाळीमिरी पावडर
  19. चवीनुसारमीठ
  20. आवडीनुसार कोथिंबीर, कांद्याची हिरवी पात

कुकिंग सूचना

तयारीसाठी वीस मिनिटे आणि शिजवण्यासाठी वीस मिनिटे
  1. 1

    सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून कापून घ्याव्यात

  2. 2

    ड्रायफ्रुट्स व मसाले, पनीर या जिन्नस पण तयार करून ठेवावे.. अर्धा वाटी कोमट दुधामध्ये केशर धागे घालावे म्हणजे ते रंग सोडतात..

  3. 3

    एका कढईत तांदूळ धुवून शिजत ठेवावे.. किंवा अर्धा तास तांदूळ भिजवून नंतर शिजवावे..भात शिजल्यावर चाळणीवर ओतून घ्यावा म्हणजे पाणी निथळून जाईल..

  4. 4

    कढईत दोन टेबलस्पून तूप घालून सगळे ड्रायफ्रुट्स एक एक करून तळून घ्यावेत.. नंतर भाज्याही चांगल्या तळून घ्याव्यात.. काही भाज्या मंद गॅसवर शिजू द्याव्या..

  5. 5

    कढईत उरलेल्या तुपामध्ये जिरं घालून ते फुलले की लसुण तुकडे तळून घ्यावेत व एक टीस्पून आलेलसुण पेस्ट घालून परतावे.. नंतर शिजवलेला भात घालावा.. मीठ व काळीमिरी पावडर टाकून चांगले मिक्स करावे आणि तळलेल्या भाज्या,ड्रायफ्रुट्स घालून सगळे चांगले मिक्स करावे...

  6. 6

    केशर चे दुध घालावे व अर्धा लिंबू रस घालून मिक्स करून झाकण ठेवून बारीक गॅसवर दोन मिनिटे ठेवावे..

  7. 7

    बस..आपला नवरत्न शाही पुलाव तय्यार खाण्यासाठी... प्लेटमध्ये काढून रायता, लिंबू,पापड सोबत सर्व्ह करावे.. किंवा नुसताही खुप छान लागतो...सोबत कशाचीही गरज लागत नाही,एवढी मस्त टेस्ट लागते..

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes