निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#br -हैदराबाद मधे राहत असताना इथल्या खूप काही रेसिपी शिकलोय, त्यातील एक निझामी चिकन बिर्यानी। इथे एकदा गोलकोंडा रिसॉर्ट मधे ट्राय केली होती, मला जाम आवडली। म्हणून काही दिवसांनी स्वतः करून बघितली।

निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)

#br -हैदराबाद मधे राहत असताना इथल्या खूप काही रेसिपी शिकलोय, त्यातील एक निझामी चिकन बिर्यानी। इथे एकदा गोलकोंडा रिसॉर्ट मधे ट्राय केली होती, मला जाम आवडली। म्हणून काही दिवसांनी स्वतः करून बघितली।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोचिकन
  2. 400 ग्रामदही
  3. 1 कपपुदिना
  4. 3 चमचेलाल तिखट
  5. 3 चमचेकाश्मिरी मिरची पावडर
  6. 2 चमचेहळद
  7. 4 चमचेमीठ
  8. 2 चमचेजीरे पूड
  9. 3 चमचेधणे पूड
  10. 3 चमचेअद्रक लसूण पेस्ट
  11. 2 वाटीबरिस्ता
  12. 2बारीक टोमॅटो
  13. खडे मसाले
  14. 4हिरव्या मिरच्या
  15. 750 ग्रामबासमती तांदूळ
  16. कोथिंबीर
  17. केसर दूध
  18. 3 चमचेतूप
  19. तेल
  20. ड्राय फ्रूट काजू बदाम किसमिस
  21. 1लिंबू
  22. 50 ग्रामखवा
  23. 1 वाटीबारीक कांदा
  24. अद्रक लसूण बारीक काप

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन मॅरीनेट करून घ्यावे, त्यात दही, मीठ, मिरची पावडर, धणे पूड, जीरे पूड, अद्रक लसूण पेस्ट, पुदिना, बरिस्ता, तूप आणि लिंबू घालून मिक्स करावे। आता कमीतकमी एक तास बाजूला ठेवावे।

  2. 2

    आता तांदूळ 4-5 वेळा धुवून घ्यावे आणि पाणी घालून 45 मिनिटे भिजू द्यावे।

  3. 3

    पुढे गरम पाणी करून घ्यावे, पाणी उकळल्यावर त्यात खडे मसाले, मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालावा। त्यात तांदूळ घालून मिक्स करावे 70-80% शिजल्यावर काढून घ्यावे।

  4. 4

    आता एका भांड्यात तेल घालून त्यात चक्री फुल, जावित्री, विलायची, लवंग, मिरे आणि दालचिनी घालावी। आणि त्यावर कांदा टाकून मिक्स करून घ्यावे। पुढे त्यावर थोड्या लसूण कळ्या आणि बारीक अद्रक टाकून मिक्स करावे आणि पुढे हिरवी मिरची आणि टोमॅटो घालावे। आता थोडे मीठ घालून झाकून ठेवावे।

  5. 5

    आता त्यात ड्राय फ्रुट आणि बिर्यानी मसाला घालावा आणि मिक्स करून घ्यावे। आता त्यावर थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे। आता पुढे त्यावर चिकन टाकावे।

  6. 6

    मॅरीनेट चिकन मिक्स करताना पाणी सुटेल तर, ते चांगले 10-12 मिनिटे परतून घ्यावे। त्यावर थोडासा खवा टाकून मिक्स करावे।

  7. 7

    आता चिकन आणि तांदूळ लेयरिंग करावे। मोठ्या भांड्यात तूप लावून घ्यावे, त्यात चिकन टाकावे, मग त्यावर तांदूळ, असे एक एक करून 2-3 लेअर टाकावे, मधे मधे बरिस्ता, पुदिना, गरम मसाला आणि केसर दूध घालावे।

  8. 8

    पुढे शेवटी त्यावर भरपूर बरिस्ता, पुदिना, केसर दूध आणि 2 चमचे तूप घालावे।

  9. 9

    आता त्यावर झाकण ठेवून कणकेने अथवा अल्युमिनियम फॉईल वापरून बंद करावे, आणि 8 मिन मध्यम आचेवर आणि 15 मिनिटे मंद आचेवर ठेवावे। आता आपली बिर्याणी तयार । पुढे स्मोकी फ्लेवर साठी एका वाटीत कोळसा घेऊन त्यावर तूप घालून 3 मिनिटे बंद करून ठेवावे।

  10. 10

    आता आपली निझामी हंडी बिर्याणी तयार । खूप स्वादिष्ट बनेल। सोबत रायता घेऊन सर्व्ह करावे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
रोजी

टिप्पण्या (11)

Similar Recipes