ताकातली पालकाची भाजी (takatli palakachi bhaji recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#पालकाची भाजी

ताकातली पालकाची भाजी (takatli palakachi bhaji recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#पालकाची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
  1. १०० ग्रॅम (१ लहान बाऊल) पालक
  2. 1 टेबलस्पूनबेसन १
  3. १०० ग्रॅम ताक
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग१
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. ८-१० लसूण पाकळ्या१
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुऊन चिरून कुकरमध्ये वाफवून घेतला. कोथिंबीर बारीक चिरून घेतली.

  2. 2

    वाफवलेला पालक थोडा थंड झाल्यावर त्यात बेसन घालून थोडेसे ब्लेंडर फिरवून घेतले. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, लसुन घालुन परतले.

  3. 3

    मग त्यात थोडे तिखट घातले. व मिक्स करून पालक व बेसनाचे मिश्रण घातले. ताक घालून त्याला उकळी येऊ दिली. मग त्यात मीठ व थोडी साखर घातली.

  4. 4

    चांगली उकळी आल्यावर बाऊलमधे काढून वरून तेल, मोहरी, हिंग, तिखट याची फोडणी घातली. व डीशमधे ताटातली पालकाची भाजी ठेवून भाकरी, ठेचा व कांदा ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes