संत्री चिया ज्यूस (santra chia juice recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #Week17 #post2

गोल्डन एप्रन 4 -आठवडा 17 चे कीवर्ड- चिया असल्याने मी संत्रा चिया ज्यूस बनवले.

चिया बियाणे काळ्या रंगाचे असून वनस्पती साल्व्हिया हिस्पॅनिकापेक्षा लहान असून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात, हृदयरोगाचा धोका कमी करणे आणि बरेच काही यासारखे असंख्य आरोग्य फायदे देतात.
संत्राचा रस व्हिटॅमिन सीने भरलेला असतो, जो आपल्या प्रतिकारशक्तीस चालना देण्यास आणि सर्दी, फ्लू आणि इतर दाहक आजारांपासून संरक्षित ठेवण्यास मदत करतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2/3 सर्व्हिंग्ज
  1. 4संत्री संत्र्याचा लगदा(pulp)
  2. 1/2इंच आले सोलून बारीक तुकडे करा
  3. 1टीस्पून मध किंवा साखर चवीनुसार
  4. १/4 कप दूध
  5. १/4 कप कोमट पाणी
  6. 1टीस्पून चिया बिया

कुकिंग सूचना

  1. 1

    चिया बिया भिजवण्यासाठी: - लहान भांड्यात चिया बिया घाला आणि नंतर त्यात 1/4 कप कोमट पाणी घाला. चिया बियाणे सर्व पाणी शोषून घेईपर्यंत १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    संत्र्याचा रस तयार करण्यासाठी: - संत्रे अर्ध्या भागात कापून घ्या. हे संत्री एका वाडग्यात पिळून घ्या. असे करण्यासाठी तुम्ही citrus reamer वापरू शकता. जर आपल्याला कमी लगदा हवा असेल तर स्ट्रेनरसह हँड ज्यूसर वापरा. किंवा संत्रा धुवून सोलून घ्या. संत्रीतून पांढरे पडदा व बिया काढा आणि ब्लेंडर जार मध्ये ब्लेंड करून घ्या.

  3. 3

    जर थंड ज्यूस पसंत असेल तर, ब्लेंडरमध्ये मिसळण्यापूर्वी एक तासासाठी संत्र्याचा लगदा फ्रिजमध्ये ठेवा. नंतर मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये आले (ginger) तुकडे, संत्र्याचा लगदा घाला आणि मिक्सर चालवा.

  4. 4

    दूध आणि मध घाला किंवा मध नसेल तर साखर घालून पुन्हा मिक्सर चालवा. जर संत्री आंबट असेल तर साखर किंवा मध यांचे प्रमाण चवीनुसार वाढवू शकता.

  5. 5

    नंतर वाटी मध्ये ज्यूस गाळणी ने गाळून घ्या.

  6. 6

    ग्लास मध्ये 1 ते 2 टिस्पून soaked Chia seeds घाला आणि नंतर त्यात ज्यूस घालून चांगले ढवळा.

  7. 7

    इच्छित असल्यास सर्व्ह करण्यापूर्वी आपण फ्रिजमध्ये संत्रा चिया ज्यूस थंड करू शकता.
    पिण्यापूर्वी किंवा सर्व्ह करण्यापूर्वी नीट ढवळून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes