चना बटर मसाला (chana butter masala recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week19 बटर मसाला हा क्ल्यू ओळखून मी चना बटर मसाला हा पदार्थ केला आहे. मोड आलेल्या कडधान्यांचा सामावेश जेवणात नेहमीच उपयुक्त ठरतो. म्हणून हा पदार्थ करायचा मी ठरवलं.

चना बटर मसाला (chana butter masala recipe in marathi)

#GA4 #week19 बटर मसाला हा क्ल्यू ओळखून मी चना बटर मसाला हा पदार्थ केला आहे. मोड आलेल्या कडधान्यांचा सामावेश जेवणात नेहमीच उपयुक्त ठरतो. म्हणून हा पदार्थ करायचा मी ठरवलं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटं
२ सर्व्हिंगज
  1. 1/2 कपशिजवलेले हरभरे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 4लसूण पाकळ्या
  5. 1 टीस्पूनतेल
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टेबलस्पूनअमूल बटर
  8. 2हिरव्या वेलच्या
  9. 1छोटं तमालपत्र
  10. 1/2 टीस्पूनजिरं
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. चिमुटभरहिंग
  13. 2लवंगा
  14. 2काळीमिरी
  15. 1 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनलाल तिखट
  17. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

३० मिनीटं
  1. 1

    प्रथम हरभरे शिजवून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरं,तमालपत्र, लवंगा, काळीमिरी, वेलच्या घालून परतून घेणे. मग त्यात हिंग, हळद, ठेचलेला लसूण घालणे. मग उभा चिरलेला कांदा घालून परतणे.

  3. 3

    आता टोमॅटो घालून परतून घेणे. सर्व शिजल्यावर गार करावे. आणि मिक्सर मधे घालावे. त्यात १ चमचा शिजवलेले हरभरे घालावे आणि मिक्सरमधून वाटून घ्यावे.

  4. 4

    आता त्याच कढईत बटर घालून त्यात जिरं घालावं. मग वाटलेला मसाला घालावा आणि तेल सुटेपर्यंत परतावं. मग शिजवलेले हरभरे घालून त्याला नीट मसाला लावून घ्यावा.

  5. 5

    आता पाणी घालून ढवळावे आणि मग गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून एक उकळी आणावी. खायला तयार चना बटर मसाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes