सत्यनारायणपुजा प्रसाद (satyanarayan pooja prasad recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

हा प्रसाद मला वाटते आपल्या भारतभर वेगवेगळ्या प्रकारे करतात पण महाराष्ट्रात जास्त असा केला जातो.मी जास्त प्रमाणात म्हणजे सव्वा किलोचा केलाय तुम्ही कमी प्रमाणात तसाच करू शकता.
250 ग्रॅम रवा ,250ग्र साखर ,अर्धा लि.दुध घेतले तर एक किलो शिरा होतो.आमच्या सोसायटीत पुजा होती म्हणून हा प्रपंच.

सत्यनारायणपुजा प्रसाद (satyanarayan pooja prasad recipe in marathi)

हा प्रसाद मला वाटते आपल्या भारतभर वेगवेगळ्या प्रकारे करतात पण महाराष्ट्रात जास्त असा केला जातो.मी जास्त प्रमाणात म्हणजे सव्वा किलोचा केलाय तुम्ही कमी प्रमाणात तसाच करू शकता.
250 ग्रॅम रवा ,250ग्र साखर ,अर्धा लि.दुध घेतले तर एक किलो शिरा होतो.आमच्या सोसायटीत पुजा होती म्हणून हा प्रपंच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 ते 2.5 तास
100 सर्विंग
  1. 250 ग्रॅम रवा
  2. 250 ग्रॅमसाखर
  3. 2.5 लि.. दुध
  4. 200 ग्रॅमकाजू तुकडा
  5. 200 ग्रॅमबेदाणा
  6. 200 ग्रॅमचारोळ्या
  7. 50 ग्रॅमवेलची
  8. 1 टीस्पून तुप
  9. 6हिरव्या सालीची केळी

कुकिंग सूचना

2 ते 2.5 तास
  1. 1

    दुध बाजूला तापत ठेवावे. केळ्याचे बारीक तुकडे करुन घ्या, वेलची पुड करून घ्या.

  2. 2

    कढईत 1/2कप तुप टाका नि त्यात काजू परता नि बाजुला ठेवा नंतर त्यात केळ्याचे तुकडे घाला नि छान मऊ होईस्तो परता नि बाजुला ठेवा.

  3. 3

    (जास्त प्रमाणात करायचा म्हणून मी आदल्या कोरडा भाजून घेतला,नाही घेतला तरी चालेल.रवा छान चाळून थोडा थोडा कोरडा भाजून घ्या.) निम्मा रवा घ्या त्यात निम्मे तुप टाकून गुलाबी होईपर्यंत भाजा. आता त्यामधे केळी,काजू,बेदाणे,चारोळ्या घाला नि छान परतून घ्या नि उकळलेले दुध हळूहळू घाला नि रवा परतून घ्या सर्व दुध घालून झाले कि व्यवस्थित मिसळून घ्यावे नि झाकण ठेऊन 10/15मिनीटे वाफ येऊन द्यावी. आता रवा छान फुलला असेल ह्या मधे आता साखर घाला नि व्यवस्थित मिसळून घ्या नि परत 15/20 मिनीटे दणदणीत वाफ येऊ द्या.

  4. 4

    आता झालेल्या शिर्यामधे वेलचीपुड, केसर घालणार असाल तर दुधात भिजवलेले केसर घाला परत मिसळून घ्या.

  5. 5

    प्रसादाचा शिरा तयार आहे नैवेद्य दाखवा नि मग मनसोक्त खा.

  6. 6

    टिप...जास्त प्रमाणात करायचा असेल तर आदल्या
    दिवशी रवा कोरडा भाजून ठेवा म्हणजे प्रसाद लवकर होतो.रवा छान चाळून थोडा थोडा कोरडा भाजून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes