रेड व्हेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#Heart
#Red_Velvet_Cake तोही #Cheese_Cream_Frosting बघणार आहोत या केक ल खूप जास्त डिमांड असते specially एनिवर्सरीला आणि व्हॅलेंटाइन डे ला......
Red Velvet Cake आपण साध्या व्हिप क्रीम ने पण बनवू शकतो पण चीझ क्रीम सोबत या cake ची taste भन्नाट लागते...

रेड व्हेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

#Heart
#Red_Velvet_Cake तोही #Cheese_Cream_Frosting बघणार आहोत या केक ल खूप जास्त डिमांड असते specially एनिवर्सरीला आणि व्हॅलेंटाइन डे ला......
Red Velvet Cake आपण साध्या व्हिप क्रीम ने पण बनवू शकतो पण चीझ क्रीम सोबत या cake ची taste भन्नाट लागते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/4 कप मैदा
  2. 1/2 कपपीठी साखर
  3. 1 टीस्पूनकोको पावडर
  4. 1/4 कपतेल
  5. 1/2 कप+ 1/4 कप दूध
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1/2 टीस्पूनव्हॅनििला इसेन्स
  9. 1 चमचेव्हिनेगर
  10. 6 थेंबलाल जेल फूड कलर
  11. व्हिप क्रीम
  12. चीज फ्रोस्टींग क्रीम
  13. लाल रंगाची ट्रटी फ्रुटी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    केक टिनला तेल लावून मैदा पसरवून घ्यावा. एक कप दुधात दोन टीस्पून व्हिनेगर घालून नीट मिक्स करून बाजूला ठेवावे दहा मिनिटांनी दुधामध्ये पिठीसाखर, तेल आणि व्हॅनिला इसेन्स व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावे, बाउल वर एक चाळणी ठेवून त्यामध्ये मैदा, कोको पावडर, खायचा सोडा आणि बेकिंग पावडर चाळून घ्यावी.(मी हा केक मोठ्या प्रमाणात बनवत असल्यामुळे प्रमाण डबल घेतले आहे)

  2. 2

    लिक्विड बॅटरमध्ये सुके पदार्थ नीट मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध घालावे, त्यामध्ये बारा थेंब रेड जेल कलर घालून ते नीट मिक्स करून घ्यावे केक टिन'मध्ये केक बॅटर ओतावे. केक बॅटर असलेल्या टिनला तीनदा टॅप करून घ्यावे त्यामुळे त्यातील हवेचे बबल्स निघून जातात.

  3. 3

    कुकर मध्ये तीस मिनिटे केक बेक करून घ्यावा. केक बेक झाल्यानंतर तो पूर्ण थंड करून घ्यावा. व्हिपिंग क्रीम बिटरने फेटून घ्यावी. त्यामध्ये चीज फ्रोस्टींग क्रीम मिक्स करून घ्यावी. केकचा वरचा भाग कापुन घ्यावा त्यानंतर केकचे २ लेअर कापून घ्यावे. प्रत्येक भागावर साखरेचे पाणी लावून घ्यावे. त्यावर क्रीम लावून घ्यावी.

  4. 4

    आपल्याला हवे तसे डेकोरेशन करावे. रेड व्हेलवेट केक तयार आहे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes