राजस्थानी केर सांगरी साग (Rajasthani Ker Sangri Saag recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#राजस्थानी
#केरसांगरी
#राजस्थान
राजस्थान या राज्यात बाकी राज्यायांसारखे खाद्यसंस्कृती नाही जरा वेगळी आहे तिथले हवामान आणि वातावरणानुसार तिथली खाद्यसंस्कृती आहे तिथे आपल्याकडे मिळतात अशा भाज्या उपलब्ध नसतात जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे राजस्थानमध्ये सुक्या भाज्या खाल्ल्या जातात तर त्या कोणत्या सुख्या भाज्या आहे ती एक पारंपारिक भाजी रेसिपी आज तुम्हाला रेसिपीतुन दाखवत आहे. पूर्ण राजस्थान मध्ये चैत्र फाल्गुन महिन्यात होळीनंतर शितला सप्तमी ,अष्टमी, नवमी ही खूप मोठ्या हर्ष उल्हास मध्ये साजरी केली जाते शीतला माता हे मुलांची माता आहे मुलांच्या दिर्घआयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या माता-भगिनी देवीची आराधना करतात आणि त्यादिवशी पूजेच्या दिवशी थंड जेवण घेतले जाते पूजेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच प्रकारची पदार्थ तयार केले जातात दोन-तीन दिवस खाल्ले जातील अशा प्रकारचे पदार्थ बनवतात त्यात सर्वात महत्वाची भाजी म्हणजे केर सांगरी ही सुकी भाजी सर्वात महत्त्वाची भाजी देवीला नैवेद्यात दाखवली जाते आणि आहारातून घेतली जाते ह्या भाजी बनवण्याचे एक कारण म्हणजे ही आहारासाठी खूप चांगली आहे आणि शरीराला थंडावा देणारी भाजी आहे ही भाजी मुख्य राजस्थानमध्ये उगवली जाते आणि तिथेच प्रमुख खाल्ली जाते
तयार भाजी प्रवासात तही नेतात बऱ्याच काळ टिकून राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 /5व्यक्ति
  1. 300 ग्राममिक्स सुख्या भाज्या
  2. केर, सांगरी, कुमटया,गूंदा, काचरी
  3. 2 टेबलस्पूनधना पावडर
  4. 2 टेबलस्पूनमिरची पावडर
  5. 1/4 टीस्पूनहळदी पावडर
  6. 8-10लाल सुख्या मिरची
  7. 10-12काजू
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनआमचूर पावडर
  10. 1/2तेल फोडणीसाठी
  11. 2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  12. 1/2 टेबलस्पूनहिंग
  13. 1/2 टेबलस्पूनराईची डाळ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम केर सांगरी/ पचकुटा भाजी यात पाच प्रकारच्या मिश्र भाज्या आहे केर,सांगरी, गुंदा, कुमटया, काचरी ह्या प्रकारची आहे ते फोटोतून बघून घ्या. दिलेली सुकी भाजी दोन तीन तास पाण्यात टाकून भिजून घेऊ

  2. 2

    भिजलेली भाजी कुकर मध्ये टाकून पाच सहा शिट्ट्या घेऊन शिजून घेऊ

  3. 3

    शिजलेली भाजी थोडी कूसकरून घेऊ त्यात दिल्याप्रमाणे अर्धे प्रमाणाचे मसाले टाकून घेऊ
    बाकीचे अर्धे मसाल्याचे प्रमाण फोडणीत टाकण्यासाठी ठेऊ
    आता फोडणी ची तयारी करून घेऊ मिरच्या काजू आमचूर पावडर, मीठ,मसाले तयार करून घेऊ

  4. 4

    दिल्याप्रमाणे कढईत तेल तापवून घेऊन या भाजीसाठी तेल भरपूर लागते तरच या भाजीला चवही राहते आणि भाजी भरपूर काळ टिकते
    फोडणीत जीरे, मोहरी डाळ,हिंग, सुक्या मिरच्या, काजू फ्राय करून.

  5. 5

    उरलेले मसाले टाकून घेऊ,आता शिजवलेली भाजी फोडनिवर टाकून मिक्स करून घेऊ

  6. 6

    भाजी व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊ
    थोडे पाणी आटल्यानंतर आमचूर पावडर टाकून घेऊ
    तयार आपली केर सांगरी/ पचकुटा भाजी
    ही भाजी पुरी बरोबर खूप छान लागते

  7. 7

    राजस्थानी फेमस चुनरी बरोबर प्लेटिंग करून घेऊ
    एकदम सात्विक आणि आयुर्वेदिक गुणांनी भरलेली अशी ही भाजी आहे

  8. 8

    कोणी राजस्थानी मारवाडी फ्रेंड असेल तर नक्की ही भाजी मागून एकदा करून खाऊन बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes