पायनॅपल पंच (Pineaaple Punch recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#jdr पायनॅपल पंच

सूर्य देवाचा वाढत जाणारा पारा त्यामुळे निर्माण होणाऱ्या उन्हाच्या झळा ,तापलेली हवा,हवेतील रुक्षपणा,मुंबईमध्ये तर समुद्रामुळे हवेतील आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण,त्यामुळे निर्माण झालेले निरुत्साही वातावरण..आळसावलेलं मन.. या सगळ्याचा शरीरावर होणारा परिणाम..सतत तहान तहान..भूक पण लागत नाही..घामामुळे शरीरातील पाण्याचे होणारे कमी प्रमाण..शरीराची सतत ठंडा ठंडा कूल कूल ची मागणी आणि ती पण ये दिल मांगे मोअर अशीच...अशावेळी तनामनाची हाक ऐकून दिल और दिमाग को ठंडक पहुंचाने के लिए वेगवेगळी सरबते,juices, fruit drinks, fruit punch आपल्या मदतीला धावून येतात..आणि शरीराला,मनाला तरोताजगी बहाल करतात..आणि त्याच थंडाव्याने आपण गुणगुणू लागतो...*आज उन्हात चांदणं पडलं गं*
पायनापल पंच ही अशीच एक गारेगार रेसिपी.. यात अननसाबरोबर तुम्ही तुम्हाला हवी ती फळे घेऊन आपण हा पंच करु शकता.. अतिशय पौष्टिक, पोटभरीचा आणि स्वादिष्ट, रुचकर असा हा पंच वेटलॉस साठी सुद्धा आहे बरं..चला तर मग रेसिपी बघूया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
2 जणांना
  1. 1 कपअननसाचे तुकडे
  2. 1लिची तुकडे करून
  3. 1संत्र्याच्या फोडी
  4. 1मोसंबीच्या फोडी
  5. 1 सफरचंदाच्या फोडी
  6. 1 टेबलस्पूनमध
  7. 1.5 चमचा काळ मीठ
  8. 1/2 टीस्पून जीरे पावडर
  9. 1 टीस्पूनचाट मसाला चवीनुसार
  10. 1.5 टीस्पून काळीमिरी पावडर
  11. 4-5बर्फाचे तुकडे

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व फळांच्या फोडी करून घ्याव्यात. आणि इतर साहित्य जमा करून घ्यावे.

  2. 2

    आता या सर्व फळांच्या फोडी मिक्सर मध्ये घालून त्यात थोडा बर्फ घालावा आणि फिरवून घ्यावे. नंतर गाळण्याने गाळून घ्यावे.

  3. 3

    आता यामध्ये काळमीठ, चाट मसाला,मध,जीरे पावडर, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.

  4. 4

    आता एका ग्लासमध्ये वरील पंच ओतून फळांच्या फोडी ने डेकोरेट करून सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes