भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄

भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)

खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 लोकांकरिता
  1. 1/4 किलोछोटी कारली
  2. भरण्यासाठी मसाला -
  3. 1 वाटी शेंगदाण्याचे कुट,
  4. 1/2 वाटी लसूण खोबऱ्याचे एकत्र वाटलेले मिश्रण
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 2 टीस्पूनकांदा - लसूण मसाला, थोडी चिंच, थोडा गूळ, कोथंबीर.
  7. 1 टेबलस्पूनतेल. सर्व साहित्य मिक्स करून ठेवावे
  8. फ्राय करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम कारली स्वच्छ धुऊन, देठ काढून उभी चीर द्यावी. त्यानंतर पातेल्यात कारली, चिंच, थोडे मीठ व पाणी घालून शिजवून घ्यावीत. एक उखळी आल्यावर पाच मिनिटेच शिजू दयावीत. अर्धकच्चीच ठेवावीत. जास्त शिजू देऊ नयेत.

  2. 2

    अर्धकच्ची शिजवून घेतलेल्या कारल्यातील बिया चमच्या टोकाने काढून घ्यावेत आणि कारली भरण्यासाठी तयार केलेला मसाला प्रत्येक कारल्यात व्यवस्थित भरून घ्यावा.

  3. 3

    भरलेली कारली थोड्या तेलावर छान फ्राय करून घ्यावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes