लाल माठाची भाजीची रेसिपी (कोकणी रेसिपी) (laal methachi bhajichi recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#KS1
या भाजीला माठाचीभाजी/चवळी माठ म्हणतात तिच्या रंगामुळे या भाजीला लाल माठ म्हणतात. ही भाजी हिरव्या पानाची पण असते ही भाजी खूप पौष्टिक आहे.महाराष्ट्रात कोकण भागात ही भाजी जास्त प्रमाणात केली जातो .वजन कमी होण्यासही भाजी उपयुक्त आहे.आहे.चला तर पाहूयात या भाजीची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10- मिनिट
4 सर्व्हींग
  1. 1 जूडीलाल माठ
  2. 2कांदे बारीक चिरलेले
  3. 4हिरवी मिरची बारीक चिरलेली
  4. 6-7लसूण पाकळ्या चिरलेला
  5. 1/2 कपओल खोबर खोबर
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. तेल
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10- मिनिट
  1. 1

    प्रथम माठाची भाजी निवडून घेऊ आणि भाजी स्वच्छ धुवून घेऊ. त्यानंतर भाजीची तयारी करून घेऊ आणि भाजी फोडणीला घालून घेऊ. त्यासाठी कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम लसूण आणि मिरची परतून घेऊ त्यानंतर कांदा, हळद घालून परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली माठाची भाजी घालून घेऊ

  2. 2

    माठ घालून झाल्यावर गॅसची फ्लेम बारीक ठेवा.भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजू दयावी शिजल्यानंतर त्यात मीठ आणि ओल खोबर घालून 1-2 मिनिट एक वाफ घ्यावी आणि गॅस बंद करावा.

  3. 3

    भाजी तयार आहे ही भाजी भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes