नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

कोकणात होळी च्या दिवशी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रस व शिरवळे.
#KS1

नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)

कोकणात होळी च्या दिवशी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रस व शिरवळे.
#KS1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
५ लोकांसाठी
  1. 2 वाट्यातांदळाचे पीठ
  2. 5-6 वेलची
  3. 1 छोटातुकडा जायफळ
  4. 1 चमचाहळद
  5. 2 वाटीखवलेला नारळ
  6. 1/2 चमचेजीर
  7. 2 चमचातूप
  8. 1 चमचामीठ
  9. 3/4 वाटीपिवळे गूळ
  10. चकलीचे भांडे
  11. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात खवलेले ओले खोबरे, जीरे, हळद, बारीक पूड केलेले जायफळ व साल काढून घेतलेली वेलची व चिमूटभर मीठ व अर्ध ग्लास पाणी टाकून मिक्सर मध्ये वरील मिश्रण लावून घ्यावे.

  2. 2

    त्या नंतर एका टोपाच्या वरती चाळणी ठेवून त्या वर कोणताही स्वच्छ कपडा ठेवावा व मिक्सर मधील मिश्रण गाळून घ्यावे. असे 2 वेळा एक पेला पाणी टाकून गळून घ्यावे.

  3. 3

    टोपावरील गाळणी काढून त्यात गूळ टाकावे व चमच्याने मिश्रण चांगले ढवळावे.व एकजीव करावे. नारळाचा रस तयार.

  4. 4

    शिरवळे बनविण्यासाठी प्रथम गॅस फास्ट ठेवून 1 ग्लास पाणी एका भांड्यात उकळून घेणे मग त्यात अर्धा चमचा मीठ व 2 छोटे चमचे तूप घालणे. मग गॅस स्लो करून त्यात तांदळाचे पीठ ऍड करणे. व चांगले एक जीव करून ढवळून घेणे. गॅस बंद करून पीठ ५ मिनिटे झाकून ठेवणे.

  5. 5

    एका पराती मध्ये सर्व वाफवलेले पीठ काढणे. थोडं वाटीत थंड पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घेणे. (थंड पाण्यात हात घालून मळण्याने हाताला गरम पिठाचे चटके लागत नाही.) मग लंब आकाराचे गोळे करून घेणे. एका टोपामध्ये 2 ग्लास पाणी टाकावे व गॅस चालू करावा. व पिठाचे ५ गोळे त्यात सोडावे. उरलेले मग सोडावे.

  6. 6

    गोळे वरती आले की समजावे गोळे शिरवळे साठी परफेक्ट झाले आहे. चकलीच्या भांड्याला (सोऱ्याला) तेल लावून त्यात तुम्हाला हवं तो बारीक किंवा जाड शेवाच भांड त्यात टाकून मग त्यात एक गोळा गाळणीच्या साह्याने गाळून सोऱ्यात सोडावे व चकलीचे भाडं बंद करावे.

  7. 7

    शिरवळे गाळताना त्याच्या खाली केळीचे पान ठेवावे व शिरवळे गाळून घ्यावे. व मग दुसऱ्या ताटात काढावे असे सर्व गोळे गाळून शिरवळे करून घ्यावे. असे गरमा गरम शिरवळे व रस खाण्याची मज्जा काय औरच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes