नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Pritam KadamRane
Pritam KadamRane @cook_26344294

#नानकटाई #सप्टेंबर
रेड वेलवेट चॉको चिप्स आणि बटरस्कॉच नानकटाई
नानकटाई हे खरं तर पर्शिअन शब्द असून नान म्हणजे ब्रेड आणि कटाई म्हणजे बिस्कीट. पूर्वी नानकटाई शक्यतो दिवाळीत बेकरीमध्ये जाऊन केली जायची पण आता सर्रास घरी ओव्हन, कुकर किंवा कढईत बेक केली जाते. तर अशी ही लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारी नानकटाई मी कुकर मध्ये केली असून त्याला 2 वेगळ्या चवींमध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

#नानकटाई #सप्टेंबर
रेड वेलवेट चॉको चिप्स आणि बटरस्कॉच नानकटाई
नानकटाई हे खरं तर पर्शिअन शब्द असून नान म्हणजे ब्रेड आणि कटाई म्हणजे बिस्कीट. पूर्वी नानकटाई शक्यतो दिवाळीत बेकरीमध्ये जाऊन केली जायची पण आता सर्रास घरी ओव्हन, कुकर किंवा कढईत बेक केली जाते. तर अशी ही लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारी नानकटाई मी कुकर मध्ये केली असून त्याला 2 वेगळ्या चवींमध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 व्यक्ती
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपबेसन
  3. 1/2 कपसाखर
  4. 3/4 कपतूप
  5. 1 टेबलस्पूनबारीक रवा
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1 टीस्पूनकोको पावडर
  8. 3-4 थेंबप्रत्येकी व्हॅनिला आणि बटरस्कॉच इसेन्स
  9. चिमूटभरलाल आणि पिवळा रंग
  10. 2 टेबलस्पूनसजावटीकरीता चॉको चिप्स
  11. 2 टेबलस्पूनबटरस्कॉच प्रलाईन

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    बटरस्कॉच प्रलाईन मी घरीच केले. त्यासाठी 4-5 बदाम आणि 8-10 काजू थोडे गरम करून घेतले आणि नंतर त्याची भरड केली. पॅन मध्ये 4 टेबलस्पून साखर घेऊन ती चमच्याने हलवत रहावे. गॅस मंद ठेवावा. साखर वितळून ब्राउन कलर आला की त्यात 2 टेबलस्पून बटर टाकावे आणि एकजीव करून लगेच भरड घालून गॅस बंद करावा. मिश्रण एकजीव करून ग्रीस केलेल्या डिशमध्ये ते मिश्रण थापावे आणि थंड झाल्यावर चुरा करून घ्यावा.

  2. 2

    साखर मिक्सर मध्ये दळून घ्या. तूप पण मिक्सर मध्ये घालून क्रिमी टेक्श्चर होइपर्यंत ब्लेंड करा.

  3. 3

    गव्हाचे पीठ, बेसन, पिठीसाखर, रवा, बेकिंग पावडर आणि किंचित मीठ घालून एकत्र चाळून घ्या. त्यात तूप घालून मळून घ्या

  4. 4

    मळलेल्या गोळ्याचे 2 भाग करून रेड वेलवेटसाठी 1 टीस्पून कोको पावडर, लाल रंग आणि 3-4 थेंब व्हॅनिला इसेन्स घाला. गोल पेढ्यासारखे गोळे करून त्यावर चॉको चिप्स लावा. बटरस्कॉच साठी दुसऱ्या भागात पिवळा रंग आणि 3-4 थेंब बटरस्कॉच इसेन्स घाला. पेढे करून त्यावर बटरस्कॉच प्रलाईन लावून घ्या.

  5. 5

    कुकर च्या झाकणाची रबर रिंग आणि शिटी काढून टाका. कुकरमध्ये स्टीलची जाळी किंवा रिंग ठेवा आणि झाकण लावून 10 मि. प्रिहिट करून घ्या. एका ट्रे किंवा डिश ला तुपाचा हात लावून त्यावर नानकटाई ठेवून 20-25 मि. मंद गॅसवर बेक करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pritam KadamRane
Pritam KadamRane @cook_26344294
रोजी

Similar Recipes