नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#सप्टेंबर #नानकटाई
नानकटाई हा चहा किंवा कॉफी बरोबर खायचा एक पदार्थ. नानकटाई अनेक फ्लेवर मध्ये करता येते. मी मँगो व स्ट्राॅबेरी फ्लेवर नानकटाई केली आहे.

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

#सप्टेंबर #नानकटाई
नानकटाई हा चहा किंवा कॉफी बरोबर खायचा एक पदार्थ. नानकटाई अनेक फ्लेवर मध्ये करता येते. मी मँगो व स्ट्राॅबेरी फ्लेवर नानकटाई केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 माणसांसाठी
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपरवा
  3. 1/4 कपबेसन
  4. 1/4 टेबलस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 कपवनस्पती तूप
  7. 1/4 कपमँगो क्रश
  8. 1/4 कपस्ट्राॅबेरी क्रश
  9. 1 टेबलस्पूनचारोळी
  10. 1 टेबलस्पूनपिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम मैदा, रवा, बेसन, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे.

  2. 2

    चाळलेल्या पीठाचे दोन समान भाग करावेत.

  3. 3

    तूप हँड बिटर किंवा इलेक्ट्रिक बिटरने फेटून घ्यावे. त्याचेही दोन समान भाग करावेत.

  4. 4

    एका भांड्यात तूप घेऊन त्यात मँगो क्रश घालून बीटरने बीट करून घ्यावे. त्यात मैद्याचे अर्धे मिश्रण घालून पीठ छान मळून घ्यावे. त्याचे हवे त्या आकारात गोळे तयार करून घ्यावेत.

  5. 5

    दूस-या भांड्यात उरलेले तूप घालावे व त्यात स्ट्राॅबेरी क्रश घालून बीटरने बीट करून घ्यावे. त्यात मैद्याचे अर्धे मिश्रण घालून पीठ छान मळून घ्यावे. त्याचे हवे त्या आकारात गोळे तयार करून घ्यावेत.

  6. 6

    मायक्रोवेव कनह्वेक्शन मोड वर 10 मिनीटे फ्रीहिट करावा. 180°cला 20 मिनिटांसाठी नानकटाई बेक करून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

Similar Recipes