खान्देश स्पेशल फुनके व कढी (Fhunke v kadhi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

खान्देश स्पेशल फुनके व कढी (Fhunke v kadhi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. ८० ग्रॅम चणाडाळ
  2. ४० ग्रॅम मुगडाळ
  3. 1 लहानकांदा
  4. 1/2 टीस्पूनबडीशेप
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1/2 टीस्पूनधणेपूड
  8. 2 टीस्पूनआलं, लसूण, मिरची पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. कढी साठी
  14. 1/2 लीटरताक
  15. 1 टेबलस्पूनबेसन
  16. 3/4 टेबलस्पूनसाजूक तूप
  17. 1/2 टेबलस्पूनकोथिंबीर
  18. 1/2 टीस्पूनजीरे
  19. 1 टीस्पूनसाखर
  20. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    प्रथम चणाडाळ व मुगडाळ दोन्ही स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत घातल्या. सकाळी त्यातील पाणी निथळून मिक्सर वर जाडसर वाटून घेतले.

  2. 2

    आता एका वाडग्यात मध्ये वाटलेल्या डाळी बडिशोप जीरे पावडर,धने पावडर, आले-लसूण-मिरचीचे वाटण ओवा हिंग हळद कांदा कोथिंबीर सर्व मिक्स केले.

  3. 3

    आता हाताने दाबून लहान लहान मुटकुळे.
    तयार केले. असे सर्व मुटकुळे तयार.

  4. 4

    गॅसवर इडली पात्रात पाणी उकळवून आता चाळीला ग्रीसिंग करून त्यावर मुटकुळे ठेवलेले. व दहा मिनिटे वाफवून घेतले.

  5. 5

    आता गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून त्यात मोहोरी जीरे कढीपत्ता मिरच्या, आले-लसूण-मिरचीचे वाटण धने जीरे पूड सर्व घालुन परतले. बेसन पीठ मिक्स करून घेतले तसेच मीठ, कोथिंबीर व साखर मिक्स केली.

  6. 6

    कढीला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद केला. फुणके व कढी डीश मधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes