कटोरी चाट

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

#किड्स
चाट म्हटलं कि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत.
लहान मुलांना कडधान्य म्हटलं कि नको वाटत पण तीच कडधान्य जरा चटपटीत पद्धतीने बनवली कि ते मुलं आवडीने खातात.
चला मग चटपटीत आणि पौष्टिक कटोरी चाट बनवूयात.

कटोरी चाट

#किड्स
चाट म्हटलं कि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत.
लहान मुलांना कडधान्य म्हटलं कि नको वाटत पण तीच कडधान्य जरा चटपटीत पद्धतीने बनवली कि ते मुलं आवडीने खातात.
चला मग चटपटीत आणि पौष्टिक कटोरी चाट बनवूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 टीस्पूनतेल
  3. 1/2 कपमोड आलेली मटकी
  4. 1कांदा (चिरलेला)
  5. 1/2टोमॅटो (चिरलेला)
  6. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर (चिरलेली)
  9. 2 टेबलस्पूनगोड दही
  10. 1/4 टीस्पूनजिरेपूड
  11. 1टिस्पून पुदीना चटणी
  12. चवीपुरतं मीठ
  13. 1/4 कपपाणी

कुकिंग सूचना

15-20 मि
  1. 1

    एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि गरम तेल घालून चांगले मिक्स करा आणि मऊ पीठ
    मळून घ्या आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    यानंतर कणकेचे 2 गोळे घ्या त्याला थोडं लाटून घ्या आणि त्यावर स्टील ची वाटी ठेवा.
    आता लाटलेल्या पोळीच्या सर्व बाजू वाटीला चिकटवून घ्या आणि जास्तीची कणिक काढून घ्या.

  3. 3

    आता एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा आणि तयार वाट्या तेलामध्ये तळून घ्या.

  4. 4

    तळलेल्या वाट्या शोषक कागदावर काढून घ्या आणि थंड व्हायला ठेवा.
    एकदा थंड झाल्या कि त्या वाट्या एका प्लेट मध्ये ठेवा.

  5. 5

    आता त्या वाट्यांमध्ये मोड आलेली मटकी,बारीक चिरलेला कांदा,चिरलेला टमाटर,शेव आणि
    कोथिंबीर टाका.
    त्यावर थोडं गोड दही,पुदिन्याची चटणी घाला.

  6. 6

    आता परत थोडी मटकी,बारीक चिरलेला कांदा,चिरलेला टमाटर,शेव आणि
    कोथिंबीर घाला.
    चटपटीत कटोरी चाट तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes