बेसन वडी, ठेचा (besan vadi thecha recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

ही आमच्याकडे म्हणजेच विदर्भात प्रवासाला जातांना हमखास केला जाणारा व सगळ्यांच्या अतिशय आवडीचा प्रवासातील शिदोरीचा मेन्यू आहे..

बेसन वडी, ठेचा (besan vadi thecha recipe in marathi)

ही आमच्याकडे म्हणजेच विदर्भात प्रवासाला जातांना हमखास केला जाणारा व सगळ्यांच्या अतिशय आवडीचा प्रवासातील शिदोरीचा मेन्यू आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 जण
  1. 2 वाट्याताक,
  2. 1 वाटीबेसन,
  3. मीठ,
  4. 4-5 हिरवी मिरची,
  5. 3-4लसूण,
  6. कोथिंबीर,
  7. जीरे ,
  8. 1 टीस्पूनलाल तिखट,
  9. 1 टीस्पूनहळद,
  10. कांदा लांब लांब चिरलेला

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    ताकामधे मीठ, बेसन घालून रवीने छान घूसळून घ्यावे.मिरची,लसूण व कोथिंबीर मिक्सर मधे पोस्ट करून घ्यायची व ताकाच्या मिश्रणात घालावी.बाकीच्या मिरच्या तेलात भाजून त्यात लसूण व मीठ टाकून ठेचा बनवून घ्यायचा.आता कढईत तेल गरम करून मोहरी जीरे तडतडल्यानंतर कांदा छान भाजून घ्यायचा.हिंग,हळद,लाल तिखट घालायचे.

  2. 2

    नंतर कांद्यामध्ये ताकाचे मिश्रण घालायचे.सारखे हलवायचे,मिश्रण घट्ट होईल..बाजूला कडेने थोडे तेल सोडून दणदणीत वाफ येवू द्यायची..नंतर ताटाला ब्रशने तेल लावून बेसन थापायचे

  3. 3

    गार झाल्यावर वड्या कापायच्या..सर्व्ह करतांना कच्चे जवस तेल,फोडलेला कांदा आणि दुधाची दशमी अशी डिश सजवून द्यायची..सोबत गुळांबा द्यायचा भरपुर साजूक तुप घालून..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

Similar Recipes