पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे.

पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)

#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
तीन
  1. 2 कपपालक
  2. 1 कपपाणी
  3. 1/2लिंबाचा रस
  4. 1-2हिरव्या मिरच्या
  5. 1/2 इंचआले
  6. 2-3लसूण पाकळ्या
  7. 3 कपगव्हाचे पीठ
  8. 1/2 चमचालाल मिरची पावडर
  9. 1 चमचाधणे पावडर
  10. तेल
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम पालकाची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.,आणि कूकर मध्ये पालकाची पाने शिजवून घेतली.आणि पालकाच्या पाण्यात अर्धा लिंबाचा रस घातला.

  2. 2

    मग पालकाची पाने थंड करून घेतली व मिक्सर मध्ये घालून त्यात हिरव्या मिरच्या, आले व लसूण घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले.

  3. 3

    मग गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ, लाल मिरची पावडर, आणि धणे पावडर घालून पीठ मळून घेतले. पीठ मळताना पालक शिजवलेले पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून मळून घेतले.

  4. 4

    पीठ जास्त घट्ट किंवा पातळ मळायचे नाही. पीठ मध्यम मळायचे. नंतर थोडे तेल घालून पीठ चांगले मळून अर्धा तास झाकून ठेवावे.

  5. 5

    अर्धा तास झाल्यानंतर पुन्हा पीठ चांगले मळून, त्याचे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या. पुऱ्या लाटताना पीठ लावायचे नाही. नाहीतर पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात.

  6. 6

    मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून घेतल्या. आणि सर्व्ह कराव्या, गरमा गरम पालक पुऱ्या. ह्या पुऱ्या खूप पौस्टीक आहेत. व चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
धन्यवाद आर्या ताई, चेतना ताई ,
सुप्रिया ताई.

Similar Recipes