बाजरी खिचडी (bajari khichdi recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm8

#week8

#बाजरी_खिचडी

बाजरी खिचडी हा माझ्यासाठी अगदी अनोळखी पदार्थ.. कारण आता पर्यंत कधीच करायची वेळ आली नाही..त्यामुळे चव कशी असते ते देखील माहित नव्हते..रेसिपी मँगझिन साठी बाजरी खिचडी ही रेसिपी मी जेव्हां वाचली तेव्हाच मनाशी ठरवलं की इस बार तो जरुर खिचडी पकेगी...बिरबलाची खिचडी नाही बरं...😀😀
थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब फर्मान काढले. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्‍या माणसास उब मिळाल्याचा निष्कर्ष अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.तो ‍गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'दुसर्‍या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. ...तर अशी ही बिरबलाची खिचडी...
चला तर मग बिना कांदा लसणाची अगदी सात्विक तरीही अफाट चविष्ट ,झटपट होणारी अशी बाजरीची खिचडी करु या...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनीटे
4 जणांना
  1. 1/2 कपबाजरी
  2. 1/2 कपमुगडाळ
  3. 5-6हिरव्या मिरच्या
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. फोडणीसाठी साजूक तूप,मोहरी,जीरे,हिंग
  6. 5-6कडिपत्त्याची पाने
  7. 1 इंचआल्याचे बारीक तुकडे
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर
  10. 1/2 टीस्पूनसाखर
  11. अर्ध्या लिंबाचा रस

कुकिंग सूचना

20-25 मिनीटे
  1. 1

    प्रथम बाजरी स्वच्छ निवडून
    पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. नंतर दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी निथळून घ्या.

  2. 2

    आता एका पातेल्यात भिजलेली बाजरी आणि मुगडाळ एकत्र करून पुन्हा एकदा धुऊन घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला आणि दोन ग्लास पाणी घालून कुकर मध्ये पाच ते सहा शिट्या करून शिजवून घ्या.

  3. 3

    आता कुकर चे झाकण पडले की बाजरीच्या खिचडी चे मिश्रण नीट घोटून घ्या.सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या. आता एका कढई मध्ये साजूक तूप घाला. तूप गरम झाले की त्यात मोहरी जीरे हिंग घालून खमंग फोडणी करून घ्या.नंतर हळद घाला आणि मिरच्यांचे तुकडे कढीपत्त्याची पाने आणि आल्याचे तुकडे आणि थोडी कोथिंबीर घालून फोडणी व्यवस्थित परतून घ्या.

  4. 4

    आता या फोडणीवर शिजलेली बाजरी आणि मुगाच्या डाळीचे मिश्रण घालून व्यवस्थित ढवळत रहा आणि थोडी साखर घाला. दोन ते तीन वाफा काढा. बाजरीची खिचडी व्यवस्थित एकजीव होऊ द्या.वरून कोथिंबीर लिंबाचा रस घालून झाकण ठेवा आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करा.तयार झाली आपली बाजरीची स्वादिष्ट खिचडी...

  5. 5

    एका डिश मध्ये बाजरीची खिचडी वाढून घ्या आणि त्यावर परत साजूक तुपाची खमंग फोडणी घालून वरून कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes