भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#nrr #भोपळा
आज नवरात्रीचा दुसरा दिवस..
भोपळा या कीवर्ड मधुन मी भोपळ्याचा हलवा बनविलेला आहे. भोपळा हा औषधी गुणांनी युक्त असा आहे. त्यात पाण्याचे प्रमाण भरपुर असून कॅलरीज फारच कमी आहे आणि फायबर चे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी भोपळा फार गुणकारी आहे. तसेच डायबेटिस असलेल्या रुग्णांसाठी भोपळा फायदेशीर आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 300 ग्रामलाल भोपळा
  2. 1 वाटीगुळ किसून
  3. 1 कपदुध
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. ड्राय फ्रूट आवडीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    भोपळा किसून घ्यावा. एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस घालून 2 मिनिटे परतून घ्यावे.

  2. 2

    2 ते 3 मिनिटांनी त्यात दुध घालून शिजु द्यावे. दुधामुळे हलव्याला छान चव येते. दुध आटेपर्यंत परतत राहावे.

  3. 3

    भोपळ्याच्या किसा मधील दुध आटले की त्यात गुळाचा किस घालून छान मिक्स करून घ्यावा. 2 मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावे. सोबतच आवडीनुसार ड्राय फ्रूट घालून मिक्स करून घ्यावे. ड्राय फ्रूट हल्व्यासोबत थोडे होऊ दिले तर खाताना क्रनचीनेस जाणवतो.

  4. 4

    आपला भोपळ्याचा हलवा तयार आहे. पिस्त्याने सजावट करून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes