उब्जे (ubje recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. १+१/२ कप तांदळाच्या कण्या
  2. 1/2 कपनारळाचा चव
  3. 1/4 कपशेंगदाण्याचे कूट
  4. 2 टेबलस्पूनफुटण्याच्या डाळ्यांची भरड
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. १०-१२ कढीपत्त्याची पाने
  7. 5-6हिरव्या मिरच्या
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1लिंबाचा रस
  10. 1/2 टीस्पूनसाखर
  11. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  12. 1 टेबलस्पूनचना डाळ
  13. 1/2 टीस्पूनमोहरी
  14. 1/2 टीस्पूनजीरे
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम तांदळाच्या कण्या स्वच्छ धूऊन रात्रभर पाण्यात भिजत घातल्या. मग त्या निथळून घेतल्या. शेंगदाणे व चना डाळ पण दोन तास भिजत घातले. फुटण्याच्या डाळ्यांची भरड करून सर्व साहित्य संकलित केले.

  2. 2

    आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालुन परतले. मग भिजवलेले दाणे व चणाडाळ घालून परतून घेतले.

  3. 3

    आता तांदळाच्या कण्या घालून त्यात थोडे पाणी घातले. व परतून वाफ आणली. मग त्यात नारळाचा चव, डाळ यांची भरड, शेंगदाण्याचे कूट घालुन परतले.

  4. 4

    ते परतून झाल्यावर त्यात साखर, मीठ व लिंबाचा रस घालून सर्व मिक्स करून चांगली वाफ आणली.

  5. 5

    तयार उब्जे डिशमध्ये ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes