उपवासाची कचोरी वेगळ्याच ढंगात (upwasachi kachori recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

उपवासाची कचोरी वेगळ्याच ढंगात (upwasachi kachori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
३ जणांसाठी
  1. ३०० ग्रॅम कोनफळ
  2. 2 टीस्पूनवरीचे तांदूळ
  3. 2 टीस्पूनराजगीरा
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. सारणासाठी
  6. १/२ वाटी ओल खोबर
  7. २ टीस्पूनशेंगदाण्याचा कूट
  8. 2 हिरव्या मिरच्या
  9. १/४ चमचा मीठ
  10. १/२ चमचा साखर
  11. २-३ खजूर
  12. 1/2 चमचाआमचूर पावडर
  13. तळणीसाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम मिक्सरमधून वरीचे तांदूळ व राजगि-याची पावडर करून घ्यावी. नंतर कोनफळाची साल काढून ते उकडून घ्यावे.

  2. 2

    नंतर कोनफळ कुस्करून त्यांत २चमचे दळून ठेवलेले वरीचे व राजगि-याचे पीठ व चविनुसार मीठ घालून गोळा मळून घ्यावा.

  3. 3

    नंतर एका भांड्यात खोबर, शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेला खजूर, बारीक चिरलेली मिरची आणि चविनुसार साखर व मीठ घालून सारण तयार करून घ्यावे.

  4. 4

    नंतर कोनफळाच्या पिठाची पारी करून त्यांत सारण भरावे व कडा बंद कराव्यात.

  5. 5

    नंतर एका कढईत तूप तापवून त्यांत कचोरी तळून घ्याव्या व गोड दही व हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्या. एवढ्या साहित्यांत अंदाजे ८ कचोरी तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes