गोबी पराठा (gobi paratha recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
#winter special
#more nutritious.

गोबी पराठा (gobi paratha recipe in marathi)

#Healthydiet
#winter special
#more nutritious.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
3लोक
  1. 4हिरव्या मिरच्या बारीक कापून पाच कडिपत्ता पाने बारीक कापून
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 1 बटाटा उकडून
  4. 1/4 किलोकोबी
  5. 1/2 इंचआले बारीक किसून
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. हिंग
  9. 5-6लसणाच्या पाकळ्या किसून
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पून धने पावडर
  12. 2 कपगव्हाचे पीठ चवीनुसार मीठ आवश्यकतेनुसार
  13. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  14. 1/2 टीस्पून जीरे पूड

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    ताटात पीठ घेऊन चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे व लागेल तसे पाणी घालत पीठाचा मऊसूत गोळा मळून घ्या.. कोबी, आले, लसूण किसून घ्या, कांदा कोथिंबीर बारीक कापून घ्या..

  2. 2

    उकडलेला बटाटा किसून घ्या किंवा स्मॅश करून घ्या.. पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालून त्यात जीरे फुलले की मिरची, लसूण, आले परतून घ्या कडिपत्ता कोथिंबीर घालून परतून घ्या आता कांदा घालून छान परतून घ्या..

  3. 3

    सर्व जिन्नस परतून झाल्यावर किसलेला कोबी घालून चागला मऊ होईपर्यंत परतून घ्यावे..3

  4. 4

    आता किसलेला बटाटा घाला व सुके मसाले, मीठ घालून चांगले मिक्स करा

  5. 5

    भरपूर कोथिंबीर घाला, मिक्स करा.प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.पराठ्याचे स्टपिंग तयार आहे..

  6. 6

    पीठ तेलाचा हात लावून मळून घ्या. लहान मोठा ज्या आकाराचा पराठा बनवायचा तेवढा पीठाचा गोळा घेऊन पुरीच्या आकारात लाटून घ्या तेल लावून थोडे सुके पीठ भुरभुरावे व कोबीचे स्टपिंग ठेवून त्यावर चिमूटभर पीठ भुरभुरावे, सर्व बाजूंनी पुरीच्या कडा उचलून मोदकाच्या आकारात वरच्या बाजूला घेऊन दुमडून घ्या व उंडा बनवून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.

  7. 7

    तवा तापत ठेवा व पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. तेल,बटर, तूप आवडीनुसार लावावे..तय्यार गरमागरम लुसलुशीत पराठे साॅस, लसूण चटणी,चाह सोबत सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes