स्टफ्ड कुळीथ पराठा (stuff kulith paratha recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#EB11
#W11
कुळीथ पराठा खूपच पौष्टीक पदार्थ......
हे पराठे खर नाविण्यपूर्ण नाहीत,हा तर उत्तराखंड चा पारंपारीक पदार्थ आहे.हे पराठे तीथे हिवाळ्यात वर्षानुवर्षे अगदी आवर्जुन केले जातात.कुळीथ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते,जी थंड हवामानात राहणार्यांसाठी अतिशय आवश्यक असते.म्हणून तीथे कुळथाचे अनेक पदार्थ हिवाळ्यात केले जातात.जसे की उसळ,पिठले,सूप,कुळीथाची डाळ वापरून दाल फ्राय......तसेच वेगवेगळ्या पालेभाज्या जसे की मेथी,पालक,पुदिना,कोथिंबीर,मुळ्याचा पाला हे कुळीथात मिसळुन याचे पराठे ही केले जातात ,हि खरे तर खूप जुनी आणि पारंपारीक रेसिपी आहे ,कोणीही करू शकतात.खूप छान होतात हे पराठे ..एकदम मउ आणि लुसलुशित....लाटताना स्टफींग बाहेर येत नाही.मी आधीही एक पारंपारीक पराठ्याची रेसिपी पोस्ट केली आहे,आणि आता हि स्टफ्ड पराठ्याची रेसिपी.....
तर अशी ही पारंपारीक रेसिपी तुम्ही ही सगळे करुन बघा.कारण ही कोणाची पर्सनल नाही तर पारंपारीक रेसीपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकुळीथ
  2. 1कांदा
  3. 3 चमचेआले,मिरची,लसूण वाटुन
  4. 1 चमचाजीरे
  5. 1 चमचाआमचूर पूड
  6. 1 चमचागरम मसाला
  7. 2 चमचेबेसन
  8. 1 चमचातिखट
  9. 1/2 चमचाहळद
  10. मीठ चविनुसार
  11. तेल
  12. कोथिंबीर,पुदिना
  13. कव्हर साठी
  14. 1 कपकणिक
  15. 1/2 कपमैदा
  16. मीठ
  17. तेल

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम कुळीथ रात्रभर भिजवुन ठेवा.सकाळी कुकरमधे तीन,चार शिट्या करुन शिजवुन घ्या.कणिकेत मैदा,मीठ,तेल घालुन नेहमीप्रमाणे गोळा भिजवुन घ्या.

  2. 2

    आता या पराठ्याचे सारण करुन घेउ या.त्यासाठी शिजलेले कुळीथ मिक्सर मधुन जाडसर वाटुन घ्या.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करुन त्यात जीरे,आलेमिरची वाटण घाला,परतुन घ्या.मग बारीक चिरलेला कांदा घाला,परता.आता यामधे हळद,तिखट,गरम मसाला घाला.बेसन घाला.परता.मग वाटलेले कुळीथ घालुन छान वाफु द्या.या मधे चविनुसार मीठ,आमचुर पुड घाला.वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर,पुदीना घाला. सारण गार होउ द्या.

  4. 4

    आता आपण पुरण पोळी करतो तशी पारी लाटुन त्यात हे कुळीथाचे सारण भरुन पराठे लाटुन घ्या.गरम तव्यावर तेल सोडुन पराठे दोन्ही बाजुंनी खमंग शेकुन घ्या.

  5. 5
  6. 6

    आता सगळे पराठे असेच करुन घ्या.हे गरम गरम कुळीथाचे स्टफ्ड पराठे मस्त दही,लोणचे,चटणी बरोबर सर्व्ह करा.खूपच छान होतात.मुलांच्या टिफीन साठी उत्तम अॉप्शन आहे.मी माझ्या मुलाला कीतीतरी वर्षांपासुन हे पराठे टिफीन मधे देते आहे,खूप आवडीने हे पराठे आमच्या घरी खाल्ले जातात.

  7. 7

    तर तुम्ही पण करुन बघा हे पौष्टीक पराठे.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes