स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB13 #W13
सध्या स्ट्रॉबेरीज मार्केट मध्ये खूप दिसतात, मला त्यांचा लालचुटुक रंग फार आवडतो. स्ट्रॉबेरी पाहिल्या तरी फ्रेश वाटते. त्या वापरुन अनेक डेझर्ट्स, ड्रिंक्स आपण बनवू शकतो. मिल्कशेक, आईस्क्रीम, स्मुदी ,केक्स मध्ये स्ट्रॉबेरी अनेकवेळा छान कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते. आजची रेसिपी ही थोडी वेगळी आहे. स्ट्रॉबेरी crumble हा थोडा वेगळा प्रकार आहे... त्याला मी कपकेक रुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला भीती होती की हा प्रयोग फसणार की काय पण हे cupcakes खूपच टेस्टी झाले.. वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून खाताना तर खूपच मजा आली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/3 कपकॅस्टर शुगर/पिठीसाखर
  3. 1/4 कपअमूल बटर (chilled)
  4. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1-1.5 टेबलस्पूनदूध
  6. 1 टेबलस्पूनस्ट्रॉबेरी क्रश (ऑप्शनल)
  7. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  8. स्ट्रॉबेरी फिलिंग साठी साहित्य
  9. दिड कप स्ट्रॉबेरी बारीक चिरून
  10. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  11. 2 टेबलस्पूनपिठी साखर/कॅस्टर शुगर
  12. व्हॅनिला आइस्क्रीम (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर, साखर घालून मिक्स करावे. नंतर त्यात फ्रिज मधले थंड अमूल बटर छोटे तुकडे करून घालावे आणि नीट मिक्स करावे.

  2. 2

    बटर थंड असल्याने तयार मिश्रण हे थोडे रफ असेल. नंतर त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. हाताने दाबून बांधले जाते का बघा त्यातच स्ट्रॉबेरी क्र श घालून मिक्स करावे.

  3. 3

    दुसऱ्या एका भांड्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी, साखर, कॉर्न फ्लोअर एकत्र करून घ्या. हे आपले फिलिंग झाले. ओव्हन 180 डिग्री ला प्री हिट करायला ठेवा.

  4. 4

    कप केक मोल्ड घेउन त्यात प्रथम मैद्याचे थोडे मिश्रण घेऊन दाबून भरा त्यावर स्ट्रॉबेरी फिलिंग घाला आणि वरुन परत मैदा मिश्रण घालून ओव्हन मध्ये 30-35 मिनिटे गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यन्त बेक करा. थंड झाल्यावर वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes