डाळ पालक (Dal palak recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1/2 मेजरींग कप तुरडाळ
  2. 1/4 मेजरींग कप मुगडाळ
  3. 3/4 मेजरींग कप पालक
  4. 1कांदा
  5. 1टमाटा
  6. 6-7लसुण पाकळ्या
  7. १ इंच आलं
  8. 2-3हिरव्या मिरच्या
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. १ १/२ टिस्पून तिखट
  11. 1 टिस्पून गरम मसाला
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टिस्पून मोहरी
  14. 1/2 टिस्पून जीरे
  15. 1/2 टिस्पून हळद
  16. 1/4 टिस्पून हिंग
  17. मीठ चवीनुसार
  18. 1/2 टिस्पून कढीपत्ता पावडर

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम डाळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घेतली. कांदा, टमाटा, लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची,पालक सर्व बारीक चिरून घेतले.

  2. 2

    आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, कांदा सर्व परतून घेतले. टोमॅटो, तिखट, मीठ सर्व मिक्स करुन परतून घेतले.

  3. 3

    नंतर वरील मिश्रणात शिजवलेली डाळ घोटून घातली. गरजेनुसार पाणी व चिरलेला पालक घालून ३-४ मिनिट उकळून घेतले.

  4. 4

    तयार डाळ पालक बाऊलमधे काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes