"खुसखुशीत मेथी ची पूरी" (Methi Puri Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#PR

"खुसखुशीत मेथी ची पूरी"

"खुसखुशीत मेथी ची पूरी" (Methi Puri Recipe In Marathi)

#PR

"खुसखुशीत मेथी ची पूरी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
दहा बारा
  1. 2 कपमैदा
  2. 1/2 कपरवा
  3. चवीनुसारमीठ
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 2 कपकापून मेथी
  6. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची लसूण ठेचा
  7. 1 टीस्पूनधने पूड
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  11. 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  12. 1 टेबलस्पूनतूप
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    मेथी स्वच्छ निवडून धुवून घ्या. थोडा वेळ पंख्याखाली सुकवून बारीक कापून घ्या.. कढईत एक टेबलस्पून तूप गरम करून मेथी परतून घ्यावी..

  2. 2

    मैदा व रवा एका वाटी मध्ये घेऊन चवीनुसार मीठ व सर्व सुके मसाले, हिरवी मिरची लसूण ठेचा, मेथी घालून मिक्स करा

  3. 3

    दोन टेबलस्पून तूप घालून हाताने चोळून सर्व मिश्रण एकजीव करावे व लागेल तसे पाणी घालून चपाती ला मळतो तसे पीठ मळून घ्या..रवा पाणी शोषून घेतो.. त्यामुळे मळताना चपाती ला मळतो तसे मळावे..व पंधरा मिनिटे बाजूला ठेवा..

  4. 4

    पीठ परत मळून घ्या व त्याची पातळ चपाती लाटून घ्या.. छोट्या वाटीने पुऱ्या करून घ्या व काट्याच्या चमच्याने टोचून घ्यावे.. म्हणजे पुरी फुगणार नाही.. मस्त कुरकुरीत होईल..

  5. 5

    अशाप्रकारे सर्व पुऱ्या बनवून घ्या व कढईत तेल तापत ठेवा.. मिडीयम गॅसवर मस्त खरपूस तळून घ्या.. खुप छान होतात..

  6. 6

    सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.. मस्त खुसखुशीत मेथी ची पूरी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes