"गाजर, फरसबी ची चटपटीत भाजी" (Gajar Farasbi Bhaji Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"गाजर, फरसबी ची चटपटीत भाजी" (Gajar Farasbi Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 1/2 कपफरसबी बारीक कापून
  2. 1/2 कपकिसलेले गाजर
  3. 1/2 कपबारीक कापून कांदा
  4. 1टाॅमेटो बारीक कापून
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1हिरवी मिरची
  7. 1 टीस्पूनघरचा मिक्स मसाला
  8. 1 टीस्पूनपावभाजी मसाला
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनजीरे , मोहरी
  11. 1/2 टीस्पूनहळद, हिंग
  12. चवीनुसारमीठ
  13. आवडीनुसार कोथिंबीर
  14. तेल
  15. 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    फरसबीच्या बाजूच्या शिरा व मागचे पुढचे टोक काढून टाका व धुवून पाणी निथळून बारीक कापून घ्या.. कांदा, कोथिंबीर,टाॅमेटो कापून घ्या.गाजर बारीक कापून किंवा किसून घ्यावे..

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी तडतडली की कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या.. टाॅमेटो घालून दोन मिनिटे परतून घ्या.. सर्व सुके मसाले घालून मिक्स करा.

  3. 3

    फरसबी आणि गाजर घालून दोन मिनिटे परतून घ्या मीठ घाला व पाव कप पाणी घालून बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजू द्यावे.. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा..

  4. 4

    मस्त चटपटीत भाजी तयार आहे.. भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes