राघवदास लाडू पारंपारिक नैवेद्य (raghvadas ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#रेसिपीबुक #week3
आज माझ्या मुलाला फूड फोटोग्राफी स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले.त्यासाठी देवाला नैवेद्य दाखवला.रव्याचे खोबरं घालून लाडू केले. ह्या लाडवाना पाठारे प्रभू समाजात राघवदास लाडू असे म्हणतात.माझ्या आजोळी ११ दिवसांचा गणपती बसतो.आजी होती तेव्हाची एक आठवण...प्रत्येक दिवशी बाप्पाला वेगळा नैवेद्य असे.तसेच दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी घरीच चिवडा ,लाडू बनवले जायचे.जे नातेवाईक बाप्पाच्या दर्शनाला यायचे तेही काहीना काही नैवेद्य म्हणून घेऊन यायचे.त्यापैकीच माझी मावशी तिच्या सासरची पारंपारिक रेसिपी म्हणून बाप्पासाठी राघवदास लाडू आवर्जुन आणायची. आजी आणि मामी ,रव्याचे पाकातले आणि बिनापाकाचे पिठीसाखर घालून लाडू दिवाळीत करायच्या.पण मावशीचे थोडे वेगळे असल्याने ,गणपतीत तिच्या लाडवांची सगळे वाट पहात आणि आवडीने खात.आज कुकपॅड चा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
२-३
  1. 1/2 कपबारीक रवा
  2. 1/2 कपखवलेले खोबरे
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 1/3 कपसाखर
  5. 1/3 कपपाणी
  6. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  7. 6-7काजू
  8. 5-6मनुका
  9. (खोबरं,साखर,ड्राय फ्रुट याांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे)

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    रवा मंद आचेवर छान भाजून घेतला.

  3. 3

    त्यात तूप, खोबरं,ड्राय फ्रुट घालून पुन्हा चार पाच मिनिटे छान परतून घेतले.त्यात वेलची पूड घातली.

  4. 4

    हे मिश्रण भाजत असतानाच, बाजूच्या गॅसवर साखरेचा पाक करायला ठेवला.छान एकतारी पाक करून घेतला.

  5. 5

    तयार पाक रवा, खोबऱ्याच्या मिश्रणात थोडा कोमट झाल्यावर घातला.आणि मिश्रण नीट मिक्स करून घेतले.साधारण अर्धा पाऊण तास झाकून ठेवले.म्हणजे त्यात पाक छान मुरतो.

  6. 6

    पाऊण तासाने मिश्रण छान मिक्स करून घेतले.आणि त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घेतले.प्रत्येक लाडूवर एक मनुका लावली त्यामुळे लाडू छान दिसतात.

  7. 7

    तयार लाडवांचा देवाला नैवेद्य दाखवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (13)

Similar Recipes