"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#ट्रेंडींग_रेसिपी

"केसर-बदाम बासुंदी "

महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी"
एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J

"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)

#ट्रेंडींग_रेसिपी

"केसर-बदाम बासुंदी "

महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी"
एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 50 ग्रामकँडेन्स मिल्क
  3. 50 ग्रामसाखर
  4. 1/2 टीस्पूनकेसर च्या काड्या
  5. 4-5 टेबलस्पूनबारीक चिरलेले बदाम
  6. 1 टीस्पूनतूप (बदाम रोस्ट करण्यासाठी)
  7. 1/4 टीस्पूनवेलची आणि जायफळ पूड
  8. काहीबारीक केलेले पिस्त्याचे काप सजावटीसाठी

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी दूध, कंडेन्स मिल्क आणि केसर एकत्र करून एकजीव करून घ्या

  2. 2

    नंतर हवं मिश्रण गॅस वर ठेवून सतत ढवळत, रिड्यूस करून घ्या

  3. 3

    बाजूला एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यात बदामाचे काप रोस्ट करून घ्या,आणि बाजूला काढून ठेवा

  4. 4

    मिश्रण शिजताना कडेला लागलेली मलई, सतत स्क्रॅप करून घ्या,आणि मिहरं ढवळत राहा

  5. 5

    आता मिश्रणात रोस्ट केलेले बदाम घालून मिक्स करा

  6. 6

    आता या मिश्रणात, वेलची आणि जायफळ पूड घालून घ्या आणि आपल्याला हवी ती कंसिस्टंसी तयार झालीं आणि बासुंदी घट्ट झाली की गॅस बंद करून बासुंदी 5 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे त्यात सगळे फ्लेवर चांगले इन्फ्युज होतील

  7. 7

    बासुंदी आधी रूम टेम्प्रेचर वर थंड करा, मग फ्रीझ मध्ये सेट होऊ द्या, त्या नंतर बासुंदी सर्व्ह करताना, त्यावर अजून थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप आणि केसर घालून थंडगार सर्व्ह करा
    "केसर-बदाम बासुंदी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes