अळूवडी रेसिपी (aloo vadi recipe in marathi)

#KS1
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात.चला पाहूयात अळूवडीची रेसिपी,
अळूवडी रेसिपी (aloo vadi recipe in marathi)
#KS1
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात.चला पाहूयात अळूवडीची रेसिपी,
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून पूसून घेऊ. त्यानंतर पानांच्या मागच्या बाजूच्या शिरा काढून घेऊ आणि पानावरून लाटण फिरवून घेऊ
- 2
आता आपण एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाच पीठ, हीरव वाटप,चिंच-गुळाचा कोळ,हळद, लाल तिखट, गरम मसाला,तीळ,मीठ चवीनुसार, पाणी हे सर्व साहित्य एकत्र तयार करून घेऊ.
- 3
आता मागच्या बाजूस हे सर्व मिश्रण लावून घेऊ मग पानाची बाजूस विरूध्द दिशेस ठेवुन पीठ लावून घेऊ असेच पान एकावरएक ठेवुन या पध्दतीने सर्व वडी लावून घेणे नंतर बाजूच्या कडा मोडून गुंडाळी करून घेणे
- 4
अशा पध्दतीने वडी लावुन घेतली एक साईडला गॅसवर मी आधीच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवल.होत आता त्यात वडीच भांड ठेवुन शिट्टी न लावता झाकण लावून अळूवडी 15-20 मिनिट वाफवून घेणार आहोत
- 5
थंड झाल्यावर सूरीने वड्या कट करून घेऊ आणि तेलात तळून घेऊया.
- 6
तयार आहे अळूवडी खूप छान झाल्या आहेत.
Similar Recipes
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #आळूवडीश्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत. Anjali Muley Panse -
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अळुवडी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.पावसाचा एकच जोरदार शिडकावा झाला की घराच्या आवारात-शिवारात अळुचं बनच्या बन लसलसायला लागतं. सुरुवातीला लहानुली असलेली पानं थोड्याच दिवसात हाताच्या पशाला मागे टाकतात...!अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचा अळू आणि वडीचा अळू अशी साधारण वर्गवारी केली जाते.खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.पावसाळ्यात पाऊस असो वा नसो कोकणातल्या जमिनी पाणथळ असल्यामुळे जमिनीतल्या पाण्यावर अळू वाढत राहातो. गणपतीला नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. मी मालवणी पद्धतीच्या अळुवडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ashrआषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली. कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
-
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतबाहेर पाऊस चालू असला की काहीतरी गरमागरम, चटपटीत खावेसे वाटते. कुरकुरीत अळूवडी त्यातलाच एक प्रकार. अळूची पाने २ प्रकारची असतात. एक वड्यांची आणि एक भाजीची, वड्यांची पाने वड्यांना वापरली तर घशात कापत नाहीत मग चिंच गूळ नाही टाकले तरी वड्या छान होतात. shamal walunj -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ngnrश्रावण महिन्यात घरोघरी आवर्जून केली जाणारी ,खमंग आणि कुरकुरीत अळूवडी.यामधे मी लसूण वापरता अळू वडी बनवली आहे. तरीही चवीत मात्र काही फरक नाही. Deepti Padiyar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडी खूप दिवसानंतर अळू वडी केली,सध्याचा वातावरणामुळे खूप महिने झालं अळू आणला नव्हता पण आज आपली थीम होती म्हणून घेऊन आले व अळूवड्या केल्या.. Mansi Patwari -
नारळदुधातील अळूवडी (naralachya dudhatil aloovadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14ह्या प्रकारची अळुवडी मी माझ्या बहिणीकडे कोकणात खाल्ली होती.आम्हा सर्वांना खूप आवडली .तेव्हा पासून मी आमच्या घरी अशीच अळूवडी बनवते.ही अळू वडी ची पाने माझ्या कीचन गार्डन मधील आहेत .फ्रेश पानाची चव काही वेगळीच लागते. Rohini Deshkar -
-
अळूवडी (aloo wadi recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र थीम, रेसिपी - २मी पश्चिम महाराष्ट्रातील... तसे बालपण मुंबईचे.. पण सुट्टीला गावाला येणे - जाणे असल्यामुळे गावच्या काही पदार्थाची चव न्यारीच 😍 गावाला मी खाल्लेली ही 'अळूवडी '... अजूनही तिची चव जिभेवर रेंगाळते, अप्रतिम..🥰. आमच्या कुलदेवीला वडी - भाकरीचा नैवेद्य असतो. वडी तळून न करता ती तव्यात फक्त परतलेली होती.. त्याप्रमाणेच मीही करून बघितली आहे, आणि सखींनो ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुवडी हा पदार्थ सर्वांच्या अत्यंत आवडीचा प्रकार. अळू वडी ची पाने आकाराने मोठी, गर्द हिरव्या रंगाची आणि मोठ्या दांड्याची, थोडी जाड असतात. अळू वडी करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मी तुम्हाला पारंपारिक ब्राह्मणी पद्धतीची अळू वडी रेसिपी सांगणार आहे. ज्यामध्ये काही घटक पदार्थांमुळे याला खूपच सुंदर चव येते. आमच्या घरी अळू वडी ही तळून खायला आवडते तिची कुरकुरीत चव सर्वांना खूप आवडते, अशा वेळी डाएट थोडा वेळ विसरावे लागते. घरी पूजा, गणपती, काही मंगल कार्य असेल तर या अळू वडी शिवाय जेवण पूर्ण होत नाही.Pradnya Purandare
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
नारळाच्या शिरातली / दुधातील अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14प्राणी, पक्षी, फळे, फुले यांचे जसे राजे मानले जातात तसे वडी पदार्थांची राणी म्हणजे अळूवडी मानली जाईल. त्यातही 'नारळाच्या दुधातली अळूवडी' म्हणजे जणू सिंहासनावर बसलेली महाराणीच. अळूचा जन्म कंदमुळाच्या वंशातील आहे. वडीच्या अळूच्या पाठीवर, भाजीचा अळू आणि शोभेचा अळू अशी आणखी दोन भावंडे. पण जेष्ठतेनुसार राजगादी वडीच्या अळूकडे आली आहे. अळूवडीने त्या गादीचा मान सर्वतोपरी राखला आहे. आग्नेय आशियातील आपले साम्राज्य विस्तारत आता जवळपास संपुर्ण आशिया व आफ्रिकेच्या बहुतांश भागात पसरले आहे. अर्थात या साम्राज्य विस्तारात अळूवडीला मानणारी प्रजा, म्हणजे घरोघरीच्या गृहिणींचा मोठा वाटा आहे. पिढी-दर-पिढी या रेसिपी घराघरांतून जपल्या गेल्या आहेत.प्रत्येक पदार्थाची एक ओळख, एक डिग्निटी असते. अळूवडीच्या बाबतीत या डिग्निटीला धक्का लावण्याचा प्रयत्न काही दुकानांमधून होतो. अनेकदा काही ढोकळा, जिलेबी, समोसा विकणाऱ्या दुकानांतून अळूवडी सदृष्य पदार्थ विकला जातो. पारंपारिक पद्धतीने बनविलेली अळूवडी ही खरी चलनी नोट मानली तर या दुकानांतून मिळणारी अळूवडी म्हणजे 'भारतीय बच्चोका बँक' या नावाने मिळणाऱ्या खेळण्यातील नोटांसारखी असते. अळूवडीची डिग्निटी सांभाळायची, तिचा आब राखायचा तर ती पारंपारिक पद्धतीने बनवून, एखाद्या खास जेवणाच्या ताटात विराजमान व्हायला हवी. आपल्याला लक्षात ठेवायला हवे, ती महाराणी आहे!अळूची पाने बाराही महिने उपलब्ध असतात. भाजीचा अळू वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने भाजी म्हणून खाल्ला जातो. अळूच्या कंदाला उपवासाच्या पदार्थांत मान आहे. पण खरी सेलिब्रिटी असते ती अर्थातच आपली अळूवडी. नारळाच्या दुधाच्या राज्यासनावर विराजमान झालेली समस्त वड्यांची महाराणी 'अळूवडी'! Ashwini Vaibhav Raut -
कुरकुरीत अळू वडी (kurkurit alo wadi recipe in marathi)
#gpसणासुदीच्या जेवणाच्या पानात अळूवडीला मान असतोच. Manisha Shete - Vispute -
अळू वडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये साधारण आळूची पाने खूप छान येतात. अळूचं गरगट पण केल जातो. पण माझ्या घरात आळूची वडी सगळ्यांना खूप आवडते.तरी आळुच्या वड्या ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 यावेळी अळूवडीची रेसिपी टाकायची म्हटल्यावर आनंद झाला. खूप दिवसांपासून अळूवडीची रेसिपी टाकायचा विचार करीत होते. पण या निमित्तानं टाकतेय. Varsha Ingole Bele -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो. Vrunda Shende -
अळुचं फदफदं (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnapमी Varsha Deshpande ह्यांंची रेसिपी रिक्रिएट केली. श्रावण महिना सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं किंवा फदफदं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. तेव्हा आजची रेसिपी अळूचं फदफदं(शब्द फारसा बरा नाहिये पण भाजी उत्तम लागते) किंवा अळूची पातळ भाजी. स्मिता जाधव -
हिरव्या वाटणातील चवदार अळूवडी(Hirvya Vatnatil Alu Vadi Recipe In Marathi)
#BPR😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण आणि वेळखाऊ असतात. कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. त्यामुळेच या अळूला 'वडीचा अळू'' म्हणतात. जेवणाच्या ताटाचा खमंगपणा वाढवणाऱ्या या अळूपासून बनविलेल्या अळूवड्या नसतील, तर खवय्यांची नाकं आपसूक मुरडली जातात. डीप फ्राय करण्याऐवजी जर अळूवड्या शॅलोफ्राय केल्या तर जास्त कुरकूरीत होतात. Vandana Shelar -
-
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या