गुजराथी घुगरा (Gujrati ghughra recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

गुजराथी घुगरा (Gujrati ghughra recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 जणांसाठी
  1. 1 वाटीकणीक
  2. 1 वाटीओले मटार दाणे
  3. 1 टेबलस्पूनआले मिरची पेस्ट
  4. 2 टेबलस्पूनओले खोबरे खवलेले
  5. 1 टिस्पून साखर
  6. मीठ चवीनुसार
  7. लिंबू रस गरजेनुसार
  8. कोथिंबीर बारीक चिरून मुठभर
  9. चिमूटभरहिंग
  10. टिस्पून जीरे
  11. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    कणीक तेलाचे मोहन आणि मीठ घालून मळून अर्धा तास झाकून ठेवा.

  2. 2

    मटार दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे, हिंग घालून क्रश मटार दाणे घालून वाफ काढावी.मीठ, लिंबू रस, साखर, आले मिरची पेस्ट आणि खोबरे किस घालून एकजीव करून घ्या.मिश्रण अगदी गार करून घ्या.

  4. 4

    कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून त्यावर वरील सारण भरून करंजीप्रमाणे दुमड घालून सगळ्या करंज्या तयार करून घ्या.

  5. 5

    कढईत तेल तापवून मंद आचेवर तळून घ्या.गरम गरम घुगरा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes