तुरीच्या डाळीची पुरणपोळी (turichya dalichi puranpoli recipe in marathi)

पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीज
गौरी गणपती च्या आगमनाने प्रसान्नाता च वातावरण. वडा पुरणचा स्वयंपाक पण काही माझ्या सारखे असतिल ज्यांना पुरण तर आवडते पण हरबरा डाळीचे चालत नाही मग त्याला पर्याय काय तर तसेच तुरीच्या डाळीचे पुरण करुन त्याच्या पुरणपोळ्या.
तुरीच्या डाळीची पुरणपोळी (turichya dalichi puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीज
गौरी गणपती च्या आगमनाने प्रसान्नाता च वातावरण. वडा पुरणचा स्वयंपाक पण काही माझ्या सारखे असतिल ज्यांना पुरण तर आवडते पण हरबरा डाळीचे चालत नाही मग त्याला पर्याय काय तर तसेच तुरीच्या डाळीचे पुरण करुन त्याच्या पुरणपोळ्या.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची डाळ धून घेउन कुकर मधे घालुन त्यात हळद, मिठ व पाणी घालून दोन शिट्टी काढुन घ्या. कणिक घेउन त्यात तेल व मिठ घालुन छान नरम मळुन घ्या.
- 2
कुकर थंड झाला की डाळ रवी किंवा स्मॅशर नी एकजीव करुन घ्या व पँन मधे काढुन घ्या व त्यात साखर गूळ घालून ते विर्घळे पर्यंत हलवत रहा थोडे घट्ट होत आले तर त्यात जायफळ व वेलची पूड घालुन परत हलवत रहा
- 3
पुरण जमा होत आले की त्यात सराटा/कलथा सरळ उभा राहत असेल तर समजावे की पुरण झाले. आत्ता ते थंड होण्यास पसरवून ठेवा. व नंतर त्याचे गोळे करुन घ्या. आत्ता मळलेल्या कण्कीचा छोटा गोळा घेउन लाटून त्याची पारि करा.
- 4
आत्ता त्यावर पुर्णाचा गोळा ठेवून मोदका सारखे बन्द करुन घ्या व छान गोल पोळी लाटा. जाड किंवा पातळ आपल्या आवडी प्रमाणे.
- 5
ही केलेली पोळी तव्यावर दोन्ही बाजुनी खमंग भाजुन घ्या. आवडत असल्यास तुप लावुन भाजुन घ्या. तयार अशी ही पौष्टिक तुरी च्या डाळिची पुरणपोळी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मी ह्या वर्षी गौरी साठी गावी गेले नाही म्हणून घरीच त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देवाला दाखवला.. Mansi Patwari -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRपुरणपोळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.महाराष्ट्रातील मराठी घरामध्ये सणावाराला,कार्यपरत्वे,कुळधर्मासाठी पुरणपोळी होत नाही असे घर शोधूनही सापडणार नाही.अतिशय शुभशकुनाची अशी ही पुरणपोळी सर्व समारंभांना परिपूर्णता देते.पुरण म्हणजे सगळ्ं काही पूर्ण झालं,असं माझी आई नेहमी म्हणायची.तिच्या दृष्टीने पुरणावरणाचा स्वयंपाक हा अगदी सोपा आणि समाधान देणारा होता.खूपच सहजपणे ती पुरणपोळी करत असे.कुठे पसारा नाही की काही नाही.हे निरिक्षण करत करतच मीही पुरणपोळी शिकले.कधीही पुरणाचा स्वयंपाक असेल तर आम्हाला एकेक तरी पुरणपोळी करायला ती सांगायचीच.पुरणपोळी आली नाही तर सासरी काय म्हणतील...असं ती नेहमी म्हणायची.त्याच शिस्तीमुळे आज थोडीफार पारंगत होऊ शकले आहे.सासरी आल्यावर माझ्या आतेसासूबाई अतिशय रेखीव पुरणपोळी करायच्या ते पाहिले.माझी गावाकडची काकूही फारच अप्रतिम पुरणपोळी करते.हल्ली बरेचदा बाहेरून ऑर्डर देऊन पुरणपोळी समारंभाला ठेवली जाते,पण आपल्या घरच्यांसाठी छोट्या प्रमाणात असेल तर घरीच स्वतः बनवलेली पुरणपोळी घरच्यांना खायला घालण्यात वेगळाच आनंद असतो.आमच्या आईकडे सोवळ्यात पुरणाचा स्वयंपाक असे.आतासारखे आदल्यादिवशी पुरण तयार केलेलेही चालत नसे.तरी इतका चटपट, वेळेत पुरणाचा स्वयंपाक आई कसा करायची ?असा मला आता प्रश्न पडतो.तेही पुरण पाट्यावर वाटायचे.आता सगळी साधनं आहेत,सोवळंही मागे पडलंय...पण जुनेजाणते सुरेखशी पुरणपोळी करणारे अलवार हात आता नाहीत ही खंत वाटते.होळीला तर पुरणपोळी व्हायलाच हवी...तीच आज केलीय...येताय ना गरमागरम,भरपूर तुपाच्या धारेने भिजलेली पुरणपोळी...आणि बरोबर उत्तम चवीची कटाची आमटी खायला(माझ्या सुनेच्या हातची खास...पर्फेक्ट चवीची!👍☺️)😋😋🙋 Sushama Y. Kulkarni -
हरबरा डाळ पुरणपोळी (Puranpoli Recipe In Marathi)
#BPR पुरणपोळी , हरबरा डाळ किंवा पीठ यापासून बनणार पदर्थांमधे बरेच पदार्थ आहेत पण महाराष्ट्राची प्रसिध्द अशी पुरणपोळी आता देशाबाहेर ही प्रसिध्द झाली आहे. तेंव्हा बघु या पुरणपोळी . Shobha Deshmukh -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 पुरणपोळी ही 5पक्वानांपैकी 1 जसे बाप्पाला मोदक प्रिय तश्या गौराईला पुरणपोळ्या प्रिय चला बघुया कश्या करायच्या ते Manisha Joshi -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post1संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते. Shilpa Limbkar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11देवीच्या नैवेद्यात पुराणाचे फार महत्व आहे. ह्या गौरी पुजनाला मी पारंपारिक पुरण पोळी केली होती. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीगौरीचा महानैवेद्यासाठी पंचपक्वान्न तर केले जातातच पण पुरणपोळी शिवाय नैवद्य अपुर्णच मानला जातो🙏🙏. निगुतीने शिजवलेले पुरण आणि सैलसर कणकेत पुरण शिगोशिग भरून मऊसुत पोळी वरून तुपाची धार आणि दुध म्हणजे ब्रह्मानंद😋 Anjali Muley Panse -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
पुरणपोळी प्रीमिक्स (puran poli premix recipe in marathi)
पुरणपोळी करताना पुरण जर तयार असेल तर पुरणपोळ्या भराभर होतात. म्हणून मी ही प्रिमिक्सचा प्रयोग करुन पाहीला आणि त्याच्या पोळ्या छानच झाल्या अगदी ताज्या पुरणा सारख्या. आता प्रिमीक्स करुन ठेवा आणि जेव्हा इच्छा होइल पोळ्या तयार. हे प्रिमीक्स ४/ ६ महिने फ्रिजमध्ये छान राहते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
-
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी पारंपारिक पदार्थ, सर्वांना हवाहवासा वाटणारा पदार्थ. पण थोडा किचकट असल्याने आजकाल मुली करायला बघत नाही. म्हणजे बघा.. पुरण शिजवताना त्यात पाणी किती घालायचे, साखर किती घालायची, याचे प्रमाण त्यांना माहित नसते.. पण तेच जर प्रमाण मोजूनमापून घातले तर, पुरणपोळी बिघडत नाही..ज्या सुगरण आहेत, असतात.. त्यांना पुरणपोळी करणे हातावरचा खेळ वाटतो. पण नवीन लग्न झालेल्या मुली किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या मुली, यांना जर पुरणपोळी करावीशी वाटली तर.... अशा मुलींसाठी खास माझी पारंपरिक *पुरणपोळी* रेसिपी.... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळीआंब्याचा सीजन किंवा पाहुणचार म्हटला की खान्देशात हमकास बनवली जाती ती डाळ आणि गुळ घातलेली पुराण पोळी. चूल आणि खापरेवरीची पुरणपोळी खायची मज्जाच काही वेगळी आहे. पण जर खापर नसेल तर आपण तव्यावरही छान पुरणपोळी बनवू शकतो. Deveshri Bagul -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळी.. आपली मराठी खाद्यसंस्कृती म्हणा किंवा एकूणच पाककला म्हणा ..हे एक सायन्सच आहे..पाकशास्त्र असं उगाच म्हणत नाहीत याला..ही एक प्रकारची तपश्र्चर्याच आहे..यामध्ये सातत्य,प्रयोगशीलता, चिकाटी,मनापासून आवड हवीच हवी. एखादा पदार्थ जमला नाही तर पुढच्या वेळेला आधीच्या चुका टाळून चिकाटीने तो पदार्थ सराईतपणे जमेपर्यंत करण्याचे सातत्य ...इथेच खर्या सुगरणीचा कस लागतो.आता हेच बघा ना उकडीचे मोदक आणि पुरणपोळी..हे दोन्ही पदार्थ सुबक रितीने जमण्यासाठी काही वर्ष खर्ची घालावी लागतात..तेव्हां कुठे अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न होते. पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे तसं राजेशाहीच ..तामझामवालं काम..दोन्हीसाठी निवांत पणा आवश्यक..कसंतरीच उरकायला जाल तर फजिती ही ठरलेलीच..आदल्या दिवशी पासून हे आपल्या आगमनाची वर्दी द्यायला भाग पाडतात..घरातील मंडळींचा काही ना काहीतरी हातभार लागलाच पाहिजे. नादलयताल सणाचा फिल देतो घरातील कुळधर्म कुळाचार असो,होळी ,पोळाअसो..सणसमारंभअसो,अगदीबारशापासून,डोहाळजेवणापासून ते मंगळागौरी पर्यंत,बोडणापर्यंत पानात, नैवेद्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक हवाच..काही वेळेस पुरणपोळी जरी विकत आणली तरी शकुनाचे म्हणून पुरण करतेच घरची गृहिणी.. त्याशिवाय तिला चैन पडतच नाही..तर अशी ही पुरणपोळी म्हणजे आपल्या खाद्यसंस्कृतीची अनभिषिक्सम्राज्ञीचहोय.. Bhagyashree Lele -
पारंपारिक सात्विक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सर्वात सात्विक ,सोज्वळ,पारंपारीक कुठला नैवेद्य असेल तर तो म्हणजे पुरणपोळी...सगळ्या सणावाराला अगदी तोर्यात मिरवणारा आणि खाणार्याला ही त्रुप्त करणारा...असा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी...अशी ही मऊसुत पुरणपोळी करणे म्हणजे कौशल्य च हो!आणिअशी पुरणपोळी चाखायला मिळणे म्हणजे अद्वितिय सुख...म्हणुन माझी ही पुरणपोळीची रेसिपी .... Supriya Thengadi -
मलई पुरणपोळी (malai puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#नेवेद्य चातुर्मास मध्ये पुरणपोळी करायला कारणच असते. गौराई च्या नेवेद्या साठी पुरण करायला फार आंनद मिळतो. माहेरवाशीण ती तिचे कोडकौतुक करण्यासाठी मी नुसतं पुरण पोळी नाही तर मलई पोळी केली. Shubhangi Ghalsasi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11हा माझा पुरणपोळीचा पहिलाच प्रयत्न होता आणि अगदी यशस्वी झाला. सणावाराला सासूबाई किंवा आई च पुरणपोळी करायच्या आणि माझ्यापर्यंत कधीच वेळ आली नाही करायची. सो धन्यवाद cookpad या थीम बद्दल. यानिमित्ताने मी पुरणपोळी करायचा योग आला आणि यशस्वी जमल्याने आनंद द्विगुणित झाला. Archana Joshi -
पुरणपोळी - गौरी चा नैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#सात्विक नैवेद्य - पुरणपोळी#पोस्ट 2 पुरणपोळी ....स्वयंपाक क्षेत्रामधील माझा आवडता प्रकार. गोड न खाणारी मी ...पुरणपोळी पुढे शरणागती पत्करते. हा स्वयंपाक मी खुप enjoy करते. पुरणाचे & कणकेचे गणित जमले ना की..मग मैदान आपलेच..निम्मी लढाई इथेच जिंकली जाते. सरसर लाटली जाणारी, टम्म फुगणारी, नर्म, खुसखुशीत पोळी खायला लाजवाब..🥰🥰 प्रत्येक गृहिणी ची पद्धतीत थोडा फार फरक असतो. मी माझ्या पद्धतीने गौराईचा पुरणपोळी नैवेद्य केला आहे.. Shubhangee Kumbhar
More Recipes
टिप्पण्या