भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week15
कसं शक्य आहे? भाजणीच्या चकलीसाठी भाजणी नको का? पण शक्य आहे....   मी एक प्रयोग करून पाहिला. भाजणीमध्ये जी धान्य घालतो (तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, गहू, पोहे आणि जिरे) त्या धान्यांची पिठं एकत्र करून मिश्रण जरा भाजून घेतलं आणि त्याची उकड काढून चकल्या केल्या. छान खमंग, खुसखुशीत झाल्या चकल्या आणि भाजणीच्या चकलीसारखी चवही आली. आता कधीही भाजणीच्या चकल्या करता येतील.. - भाजणी न करता..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

120 मि
10 सर्विंग
  1. 3 कपतांदळाचं पीठ
  2. 3/4 कपबेसन
  3. 1 कपउडीद डाळीचं पीठ
  4. १/८ कप कणिक
  5. १/८ कप पोह्याचं पीठ
  6. 1/2 कपजिरेपूड
  7. 4 कपतयार भाजणी
  8. 4 कपपाणी
  9. 4 टेबलस्पूनलोणी / तेल
  10. चवीनुसार मीठ
  11. 1/4 चमचाहळद
  12. 3/4-1 चमचालाल तिखट
  13. 1/4 चमचाहिंग
  14. 2 टेबलस्पूनतीळ
  15. १ टेबलस्पूनओवा

कुकिंग सूचना

120 मि
  1. 1

    भाजणीची कृती - सर्वसाहित्य एकत्र करून मंद आचेवर ३-४ मिनिटं  भाजा. भाजणी तयार आहे. 

  2. 2

    एका पातेल्यात ४ कप पाणी गरम करायला ठेवा. उकळी आली की भाजणी आणि तीळ वगळून सर्व साहित्य घाला. पातेलं गॅसवरून उतरावा. पाण्याचे बुडबुडे येणं बंद झाले की भाजणी घाला आणि तीळ वगळून सर्व साहित्य घाला. मिक्स करा. मंद गॅसवर झाकण ठेवून २ मिनिटं वाफ आणा. गॅस बंद करा. पिठात तीळ घाला आणि २-३ तास झाकून ठेवा.

  3. 3

    पीठ छान मळून घ्या. जरूर पडल्यास पीठ मळताना हात पाण्यात बुडवून घ्या. 

  4. 4

    चकल्या पाडून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.

  5. 5

    गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. चकल्या १५ दिवस छान राहतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes