सुक्या बोंबीलाची चटणी /ठेचा (sukya bombilachi chutney recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week4 #chutney

#पारंपारिकउखळपद्धत

ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबील आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात. सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा पावसाळ्यात वादळी मुळे बोटी जेव्हा मासेमारी साठी जात नसतात तेव्हा सुकी मच्छी वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही. 🤷‍♀️😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
5 जणांनासाठी
  1. 5-6सुके बोंबील
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 4-5लसुण पाकळ्या
  4. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  5. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम गॅसवर बोंबील भाजून घ्या. भाजून झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या.

  2. 2

    नंतर उखळ मध्ये भाजलेल्या बोंबलाचे तुकडे व लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लिंबू रस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित बारीक ठेचून घ्या. उखळ नसल्यास मिक्सरमध्ये 2 सेकंद फिरून घ्या.

  3. 3

    सुक्या बोंबीलाची चटणी वाफाळत्या करी भाताबरोबर किंवा गरमागरम भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes