डाब चिंगरी (daab chingari recipe in marathi)

#पूर्व
शाळेत देशाची प्रतिज्ञा म्हणताना '...विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे' असे आपण म्हणत असू. हि विविधता किती नानाविध प्रकारची असू शकते हे समजायला लागल्यापासून आजवर हा अभिमान वाढताच राहिला आहे. समुद्राकाठच्या भागात तेच नारळ, तीच कोलंबी, तेच मसाले असताना, याच घटकांपासून आपल्या पश्चिम किनारपट्टी पेक्षा खुप वेगळी रेसिपी पूर्व किनारपट्टीवर बनवली जाते. ती म्हणजे पश्चिम बंगालची प्रसिद्ध 'डाब-चिंगरी' ही रेसिपी. डाब म्हणजे शहाळे अथवा कोवळा नारळ. चिंगरी म्हणजे (मोठी) कोलंबी. शहाळ्याच्या मलई आणि पाण्यामधे, मोजक्या मसाल्याच्या पदार्थांनी तयार होणारी एक विविधतेने नटलेली रेसिपी आहे. नारळाची गोड चव, मिरचीचा तिखटपणा, राईची पेस्ट आणि तेलाचा चुरचुरीत स्वाद कोलंबीच्या चवीत मिसळून ही अफलातून रेसिपी तयार होते. दर्दी सी-फुड प्रेमींनी ती अजिबात चुकवू नये.
डाब चिंगरी (daab chingari recipe in marathi)
#पूर्व
शाळेत देशाची प्रतिज्ञा म्हणताना '...विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे' असे आपण म्हणत असू. हि विविधता किती नानाविध प्रकारची असू शकते हे समजायला लागल्यापासून आजवर हा अभिमान वाढताच राहिला आहे. समुद्राकाठच्या भागात तेच नारळ, तीच कोलंबी, तेच मसाले असताना, याच घटकांपासून आपल्या पश्चिम किनारपट्टी पेक्षा खुप वेगळी रेसिपी पूर्व किनारपट्टीवर बनवली जाते. ती म्हणजे पश्चिम बंगालची प्रसिद्ध 'डाब-चिंगरी' ही रेसिपी. डाब म्हणजे शहाळे अथवा कोवळा नारळ. चिंगरी म्हणजे (मोठी) कोलंबी. शहाळ्याच्या मलई आणि पाण्यामधे, मोजक्या मसाल्याच्या पदार्थांनी तयार होणारी एक विविधतेने नटलेली रेसिपी आहे. नारळाची गोड चव, मिरचीचा तिखटपणा, राईची पेस्ट आणि तेलाचा चुरचुरीत स्वाद कोलंबीच्या चवीत मिसळून ही अफलातून रेसिपी तयार होते. दर्दी सी-फुड प्रेमींनी ती अजिबात चुकवू नये.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोलंबी नीट साफ करून घ्यावी.
शहाळयाची मलई व पाणी काढून घ्यावे. व शहाळे रिकामे करून घ्यावे.
आता चित्रात दाखविल्याप्रमाणे बाकीचे सगळे साहित्य घ्यावे.
मिक्सर मधून शहाळयाची मलई, शहाळयाचे पाणी, थोडा लसूण व थोडी हिरवी मिरची असे एकत्रित वाटून घ्यावे.
(वाटताना साधे पाणी घालायचे नाही. फक्त शहाळयाचे पाणी वापरायचे आहे.) - 2
आता एका पण मध्ये तेल घेऊन त्यात पाच फोरण घालून घ्यावे. थोडे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण व मिरची घालावी.
कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यावे.
आता त्यात वाटलेले शहाळयाच्या मलईचे वाटण घालावे व थोडेसे शहाळयाचे पाणी घेऊन परतवून घ्यावे.
तयार मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यात हळद, राईची पेस्ट व चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
आता त्यात साफ करून ठेवलेल्या कोलंब्या घालून मिक्स करून घ्याव्यात. - 3
आता वरील कोलंबीचे एकत्रित मिश्रण रिकामे केलेल्या शहाळयामध्ये भरावे. वरून शहाळयाचे कवर करावे आणि त्याला कणकेने सील करून घ्यावे.
(चित्रात दाखविल्याप्रमाणे.) - 4
आता एका कुकर मधे अर्धे शहाळे बुडेल एवढे पाणी घेऊन त्यात सील केलेले शहाळे ठेवावे. कुकरचे झाकण बंद करून तीन ते चार शिट्या करून घ्याव्यात.
- 5
कुकर थंड झाल्यावर शहाळे बाहेर काढावे. गरमागरम डाब चिंगरी तय्यार !!!
मस्त गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चांदोबाची वडी(श्रीखंड वडी) (shrikhand wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6लहानपणी श्रीखंड वडी ला आम्ही चांदोबाची गोळी बोलत असू. पिवळसर नारिंगी लहान गोल गोड श्रीखंड वडीच्या गोळ्या. जिभेवर विरघळणाऱ्या चांदोबाच्या गोळ्या खाताना आजही मन बालपणात हरवते. कुक पॅडने चंद्रकोरीची थीम दिली आणि जुन्या चांदोबाच्या गोळ्यांची आठवण आली. श्रीखंड वाड्यांची अॉथेंटिक रेसिपी शोधली आणि चांदीच्या गोळीची चंद्रकोर बनवली. Ashwini Vaibhav Raut -
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत. Anushri Pai -
पनीर नारळाचे मोदक (paneer naral modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यआपण शुचिर्भूत मनाने शिजवलेले अन्न स्वतः खाण्यापूर्वी पहिला मान म्हणून देवापुढे 'नैवेद्य' ठेवतो आणि त्याचा आपल्यासाठी प्रसाद होतो.आम्हा पाचकळशी वाडवळांच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत 'नैवेद्य' हा विस्तृत विभाग आहे. गणपतीला ओला नारळ आणि गुळाच्या सारणाचे उकडीचे मोदक असोत वा माघी गणपतीला तीळकुटाचे मोदक असोत. गौरीला अळू-कोलंबीचा नेवैद्य असो वा घरजत्रेला कोंबड्याचा नैवेद्य असो. पुरणपोळी, खीर, बासुंदी पासुन पंचपक्वान्नाने सजलेल्या नैवेद्याच्या पानापर्यंत नैवेद्याची यादी फार मोठी आहे.मी या पुर्वी अनेकदा खव्याचे मोदक बनवले आहेत. पण सध्या खवा उपलब्ध नव्हता, आणि ताजे पनीर घरात आणलेले होते. मग काय थोड्या कल्पकतेने पनीर आणि नारळाच्या मोदकाची रेसिपी आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात तयार केली. सादर आहेत, पनीर-नारळाचे मोदक !!! Ashwini Vaibhav Raut -
मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं (mod alelya monngachi bhiranda recipe in marathi)
" मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं "माझी #३०० वी रेसिपी आमच्या घरी दर सोमवारी आवर्जून केली जाणारी उसळ भाजी.. फार छान आणि चमचमीत होते...👌👌 मी खालील रेसिपी कांदा ,आलं लसूण पेस्ट घालून बनवली आहे, पण हे तिन्ही पदार्थ वगळुन सुद्धा हे भिरडं भारी होत..👍 Shital Siddhesh Raut -
रताळ्याच्या घा-या (ratalyachya gharya recipe in marathi)
#md आईच्या हाताच्या घा-या मी आज बनवलेल्या आहेत, ती नाही पण तिने शिकवले ली ही रेसिपी आजही माझ्यासोबत आहे. Rajashree Yele -
-
थुक्पा (Thukpa recipe in marathi)
#पूर्व #उत्तर_पूर्व जगातील सर्व प्रकारची भौगोलिक विविधता एकट्या भारतात सापडते. म्हणजे समुद्र किनारा ते वाळवंट आणि बर्फाच्छादित प्रदेश ते डोंगराळ प्रदेश. तर अश्या ह्या विविधतेने नटलेल्या भारताची खाद्यसंस्कृतीही तितकीच विविधतेने नटलेली आहे. त्या त्या प्रदेशाचे रंग आणि चव हमखास खाद्यसंस्कृतीत सापडतात. आता हेच बघा ना भारताच्या उत्तर पूर्वेकडे असलेल्या सिक्कीम,नागालॅंड सारख्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पण तरीही सात्विक प्रदेशाची खाद्यसंस्कृतीही तितकीच साधी आणि सात्विक. त्यातलेच हे थुक्पा म्हणले तर सुप नाहीतर वन पाँट मील. हे सुप सिक्कीम ते अगदी दार्जिलिंग पर्यंत सगळीकडे बनवले जाते. असले orignal तिबेटचे तरी आपला भारतीय टच दिल्याने ते आता भारतीयच😊😋#उत्तर_पूर्व ,#पूर्व Anjali Muley Panse -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#amr#मॅंगो मिल्कशेकसध्या आंब्याचा सिझन चालू आहे. त्यामुळे चुकून एखादा पदार्थ करायचा, खायचा राहून गेला अशी हुरहुर वाटायला नको. म्हणूनच हा अट्टाहास..... मॅंगो मिल्कशेक Namita Patil -
काशी कोहळ्याचे बोंड / गुलगुले (gulgule recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#घरी मोठे काशी कोहळे होते. ते फोडले ! आता त्याचे काय काय पदार्थ बनवायचे, याची यादी तयार केली. आणि मग सुरुवात झाली पदार्थ बनवण्याची! सुरुवातीला गुळशेलं झाले! आता नंबर होता बोंडाचा! पण या वेळेस बोंड करतांनी नेहमीप्रमाणे न करता थोडे वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवीले.. म्हणजे कोहळे न शिजवता मिक्सरमध्ये बारीक करून... तर बघूया, माझ्यासाठी तरी वेगळी पद्धत... तसेही या आठवड्यात ट्रेंडिंग रेसिपी मध्ये कोहळ्याचे गुलगुले आहेतच... Varsha Ingole Bele -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
पश्चिम बंगाली डिश आलू पोस्टो सोबत लुची (luchi recipe in marathi)
#पूर्वपश्चिम बंगाली डिश "आलू पोस्टो"आलू म्हणजे ‘बटाटे’ आणि पोस्टो म्हणजे ‘पोपी बियाणे’. या रेसिपीमध्ये बटाटे किंवा आलू, खसखस, हिरव्या मिरच्या सोबत शिजवतात.पश्चिम बंगाली "लुची " ही पारंपारिक बंगाली तळलेली पफ्ड ब्रेड आहे जे मैदा वापरुन बनवतात. पारंपारिकपणे, लुची तुपात तळून घेतात त्यामुळे ते अतिशय चविष्ट लागतात. Pranjal Kotkar -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi -
कोलंबीचे सुके (Kolambiche Suke Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी खायला सोपी त्यामुळे घरातल्या सगळ्यांना ती आवडते. जेवणाची लज्जत वाढते. आज आपण बघणार आहोत कोलंबीचे सुके, ज्याची चव आंबट तिखट अशी मस्त असते भाकरी किंवा भाताबरोबरही तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागते Anushri Pai -
पोळीचा लाडू (Policha ladoo recipe in marathi)
#आई.. १.अतिशय स्तुत्य उपक्रम. आईला समर्पित करायचं . हि भावनाच किती छान आहे.आज माझ्या आईसाठी मी केला "पोळीचा लाडू". अतिशय सोप्पी साधी रेसिपी. पण तिला आवडणारी. आणि शाळेत आमच्या डब्यातला हमखास मिळणारा खाऊ. Samarpita Patwardhan -
नाचणी सत्व नानखटाई (nachani satva nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#week4#नानखटाई#नाचणीनाचणी सत्व बनवितांना नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. मोड आले कि सावलीत वाळवावी आणि दळून आणावी. ते झाले नाचणी सत्व तयार. नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पिठामध्ये वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशी बनवता येते.बिना ओव्हन स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतनाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो.नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्वाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
सातारा कंदीपेढा (satara kandi peda recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 3 प्रत्येक जिल्हयाचे काहीतरी वैशिष्ट्य असते.साताराचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.दुध घट्ट होईपर्यंत आटवले जाते. खवा जास्त भाजल्यामुळे त्याला एक पिवळसर,लालसर असा रंग येतो आणि हे पेढे जास्त दिवस टिकतात. Sujata Gengaje -
-
मेथी आंबा
#Myfirstrecipeनमस्कार Cookpad Cookpad मधली ही First Recipe आहे. Thank youमला Cookpad विषयी सांगितल्या बद्दल . मला लहानपणा पासून मेथी आंबा खुप आवडतो. I miss you आजी ...... माझी आजी मला मेथी आंबा करून द्याची. माझा हा आवडता पदार्थ आहे .आवडता पदार्थ असल्यामुळे मी हा पदार्थ प्रथमच टाकते. मेथी आंबा हा माझ्या सारखाचं आहे ,तिखट,आंबट आणि गोड.. माझ्या लिखाणात काहि चूक झाली असेल तर माफ करा..Thank you.... Jaishri hate -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमेलाच रक्षाबंधन ही असते.नारळीपोर्णिमेला कोळी बांधव सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात. मासेमारी करायला सुरुवात करतात.आजच्या दिवशीचा खास पदार्थ म्हणजे नारळीभात. Sujata Gengaje -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
हिवाळ्यात आवळे, ओली हळद पाहायला मिळते. आपण रोजच्या जेवनामध्ये हळद वापरतो. ती औषधी ही आहे. अशा या बहुगुणी ओल्या हळदीचे मी लोणचे तयार केले आहे. चला पाहुयात रेसिपी. Rupali Atre - deshpande -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
मॉम्स फेवरेट शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#आईआईला समर्पित असलेली डिशआईला शिरा हा प्रकार अतिशय आवडायचा, खूप जास्त गोड ती शिरा बनवायची,कुणी जर घाईगडबडीत ला पाहुणा आला तर झटपट गोड ती नेहमी शिरा च बनवायची, तीतिच्या लहानपणीच्या मला गोष्टी सांगायची,ती म्हणायची की आमच्या लहानपणी असं काही खूप गोडाचे काही वेगवेगळे प्रकार दुकानात नाही मिळायचे जसे तुम्ही चॉकलेट खता बाहेरून किंवा किंवा तुम्हाला इच्छा झाली तर वेगवेगळे पदार्थ जे दुकानात मिळतात गोडाचे..... असे आमच्या लहानपणी मिळायचे नाही, म्हणून आम्हाला साखर ही खूप जास्त आवडायची, कारण साखर ही अशी गोष्ट होती आमच्या लहानपणी की, एक स्वीट डेझर्ट म्हणून साखर वेळेवर उपलब्ध राहायची, त्याच्यामुळे आम्हाला साखरेचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं,आई सांगायची कि आम्ही लहानपणी लपून छपून साखरेचे बक्के मारायचे, आणि लहानपणी साखर खूप खाल्ल्याने माझे दात पूर्ण खराब झालेत,हे ऐकून मी खूप असायची....म्हणून ती नेहमी सांगत असायची की गोड कमी खा,अशी ही आमची गोड आई तिचा लहानपणी च्या गोष्टी सांगायची...आणि तिच्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप हसू यायचे,छान वाटायचं तेव्हा तिच्या अशा छान लहानपणीच्या गोष्टी ऐकून... Sonal Isal Kolhe -
ड्रायफ्रूट्स स्मूदी (dryfruits smoothie recipe in marathi)
#gur . उघा हरितालिका उपास म्हणून मी आज हेल्दी रोसिपी बनवली आहे झटपट होणारी. Rajashree Yele -
मश्रूम हरिया (mushroom hariya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत,पावसाळा आला की वेगवेगळ्या रानभाज्या मुबलक प्रमाणात दिसायला लागतात, साधारण आषाढाच्या शेवटी शेवटी वर्षभर दुर्मिळ असलेली गावठी मशरूम एखाद्या ठिकाणी अचानक गवसतात. माझं नशीब खूप छान .त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा माझ्या नेहमीच्या भाजीवाल्याने माझ्यासाठी ही गावठी बटन मशरूम ठेवली होती .भाव थोडा जास्तच होता, पण मी घेतले कारण पुन्हा वर्षभर मिळाले नाही तर ,शिवाय प्रथिनांचा खजिना सुद्धा असतो यामध्ये .आज अगदी कमी साहित्यात एकदम गावठी स्टाईल हिरव्या मिरच्या वापरून मशरूम भाजी करूया. Bhaik Anjali -
मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp#मिक्सफ्रुटसॅलडवेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असतेफळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि केही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरातजीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजेअशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजेफळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातातमी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होतेतर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपीनक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#विक४#नानखटाई#शिंगाडानानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो. स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतथंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#Trending_recipe...#साबुदाणा_खीर.. सध्याची साबुदाणा खीर गुगल वरील ट्रेंडिंग रेसिपी.. आणि त्यात आज योगिनी एकादशी..🙏हा सुरेख संगम आज जुळून आला.. म्हणून मग उपवासासाठी आज साबुदाण्याची खीर करायचे ठरवले. साबुदाणा म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते सर्वांची आवडती साबुदाण्याची खिचडी... पण त्याचबरोबर साबुदाण्याचे थालपीठ, साबुदाणा वडा ,साबुदाणा आप्पे ,दही साबुदाणा, साबुदाणा पीठाचे लाडू ,साबुदाणा चकली, साबुदाणा पापड ,साबुदाण्याची खीर असे अनेक प्रकार आपण या साबुदाण्यापासून करतो आणि सारे खवय्ये एकादशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ ठरवतात..😜 आज मी माझ्या मामेसासूबाईंची रेसिपी असलेली साबुदाण्याची खीर केली आहे.. यामध्ये त्या विहिरीला थोडासा घट्टपणा आणण्यासाठी आणि अधिक पौष्टिक करण्यासाठी यामध्ये काजू आणि बदाम यांची पूड वेलची पूड जायफळ पावडर घालत असत.. त्यामुळे साहजिकच अत्यंत चविष्ट शाही साबुदाण्याची खीर तयार होत असे.. ही साबुदाण्याची खीर अगदी लहान मुले,वृद्ध व्यक्ती यांना देखील पौष्टिक आहार म्हणून देता येतो..चला तर मग साबुदाण्याची शाही खीर ही झटपट होणारी उपवासाची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
गोविंददास लाडू (Govinddas laddu recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
बारीक शेवई चा गोड उपमा (seviya cha god upma recipe in marathi)
"बारीक शेवई चा गोड उपमा" आपण शेवयांची खीर नेहमीच बनवतो.. सणासुदीला किंवा उपवास सोडायला गोडाचे पदार्थ भरपूर आहेत.पण जशी शेवयांची खीर झटपट होणारी आहे.. तसेच शेवयांचा गोड उपमा सुद्धा अगदी पटकन बनवुन होतो.. आणि चविष्ट बनतो.आमच्याकडे तर आठ, पंधरा दिवसांतून एकदा बनते ही रेसिपी..आज गोकुळाष्टमी साठी हा गोडाचा नैवेद्य बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या