ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो.

ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)

#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1ब्रेड चे पाकीट
  2. 2बारीक चिरलेले कांदे
  3. 4पाच हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  6. 1 टेबलस्पूनधने पावडर
  7. चवीपुरता मीठ
  8. चिमुटभरसाखर
  9. 1/2 टेबलस्पूनआमचूर पावडर
  10. 1/4 टेबलस्पूनहळद
  11. 1/2 मोठा चमचातेल
  12. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  13. 1 टेबलस्पूनडाळींबाचे दाणे
  14. 2 टेबलस्पूनदूध
  15. 2 टेबलस्पूनबारीक शेव
  16. 1 टेबलस्पूनजीरे पावडर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    ब्रेडचे पाकीट काढून ठेवावे.उपमा साठी लागणारी ब्रेड भांड्यामध्ये काढून ठेवावी

  2. 2

    ब्रेडचे मोठे तुकडे करून घ्यावेत.मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घ्यावे.

  3. 3

    कांदा आणि मिरची बारीक चिरून घ्यावी.कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी.

  4. 4

    मोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जीरे,पावडर,आमचूर पावडर,टाकावे.

  5. 5

    त्यानंतर ब्रेडचा चुरा टाकावा. आणि किंचित दूध शिंपडावे. वरून थोडी साखर टाकावी.दोन मिनिटे मंद आचेवर एक वाफ येवू द्यावी. कोथिंबीर टाकावी आणि गॅस बंद करावा.गरम गरम उपमा तयार आहे.

  6. 6

    एका प्लेट मध्ये ब्रेडचा उपमा घेवून थोडे शेव, डाळींबाचे दाणे, आणि कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes