नाचणीचे रस घावन (nachniche ras ghavan recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#bfr
सकाळचा नाश्ता पोटभरीचा हवाच पण त्यासोबतच पौष्टिक पण असायला हवा.
मी आज असाच एक पौष्टिक नाश्त्याची रेसिपी दाखवते आहे. हे घावन मस्त मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे लहान मुले पण आवडीने खातात.
तोंडात गेल्याबरोबर हा घावन विरघळून जातो.
सोबतीला रस त्यात हा घावन मस्त बुडवायचा.... आणि तोंडात टाकायचा....कधी पोटात जातो ते समजत पण नाही....😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 1 कपनाचणीचे पीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल
  5. पाणी
  6. रस बनवण्यासाठी
  7. 1 कपकिसलेले ओले खोबरे
  8. 1/3 कपगूळ
  9. वेलची पावडर
  10. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. एक बाउल मध्ये घेऊन त्यात नाचणीचे पीठ, मीठ आणि थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करा. आपल्याला हे मिश्रण पातळ ठेवायचे आहे.

  2. 2

    पॅन गरम करून घ्या. त्यावर तेल लावून घ्या. वाटीने घावनचे पीठ ढवळून घ्या.

  3. 3

    आता तापलेल्या पॅन वर ते पीठ फोटोत दाखवले आहे तसे वाटीने टाकून पसरून घ्या.
    गॅस मोठा ठेवून झाकण ठेवा. 1 मि. झाले की झाकण झाकण काढून घ्या घावन बाजूने सुटत गेले की भाजलेली बाजु परतवून दुसरी बाजू भाजा. आणि प्लेट वर नाहीतर केळीच्या पानावर काढून घ्या.

  4. 4

    आता रस साठी खोबरे मिक्सरमध्ये पाणी टाकून फिरवून घ्या.
    चाळणीने रस गाळून त्यात किसलेले गूळ आणि वेलची पावडर टाकून एकजीव करा.

  5. 5

    सकाळच्या नाश्त्याला रस घावनचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes