मटारचे पॅटीस (matarache patties recipe in marathi)

हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या खाण्याची खूप चंगळ असते. ताज्या ताज्या वाटण्याच्या शेंगा,पातीचा कांदा,गाजर टाकून छान छान कुरकुरीत हिरव्या मटारचे पॅटीस बनविले
मटारचे पॅटीस (matarache patties recipe in marathi)
हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या खाण्याची खूप चंगळ असते. ताज्या ताज्या वाटण्याच्या शेंगा,पातीचा कांदा,गाजर टाकून छान छान कुरकुरीत हिरव्या मटारचे पॅटीस बनविले
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वाटण्याच्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढावे.वाटाणा स्वच्छ धुवावा आणि चाळणीत निथळत ठेवावा.
- 2
पातीचा कांदा स्वच्छ निवडून घ्यावा.पातीचा कांदा छान धुवून घ्यावा आणि बारीक चिरून घ्यावा.बटाटे उकडून सोलून घ्यावे.कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घ्यावी मिरच्या बारीक चिरून घ्यावा.
- 3
मिक्सर मध्ये वाटाणा,पातीचा कांदा,मिरची,कोथिंबीर,जीरे,टाकून जाडसर वाटून घ्यावा. गाजर धुवून गाजराचा कीस करावा.
- 4
वाटण्याच्या सारणामध्ये सोललेल्या बटाट्याचा कीस टाकावा.तांदळाचे पिठ,भाजणीचे पीठ,धने पावडर,जीरे पावडर,मीठ,चीली फ्लकेस, मिरे पावडर, पेरीपेरी मसाला गाजराचा कीस टाकावा
- 5
वरील सर्व मिश्रणाचे पॅटीस आकाराचे गोळे तयार करावे.कढई मध्ये तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर पॅटीस तळावे आणि टिश्यू पेपर वर ठेवावे.
- 6
हरेभरे वाटण्याचे पॅटीस चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफ्ड मटार पॅटीस (stuufed matar patties recipe in marathi)
#EB3 #W3.... हिवाळा आला की ताजे हिरवे मटार मिळाला लागतात.. आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणं सुरू होते. तेव्हा आज सुटीचा दिवस असल्याने, मी केले आहे मटारचे स्टफ्फिंग घालून पॅटीस... खूप छान, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे... Varsha Ingole Bele -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar -
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
आज मी वांग्याचे भरीत करत आहे. पातीचा कांदा,मटार ,टोमॅटो,हिरव्या मिरच्या टाकलेले हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेचा किंवा कोशिंबीर बरोबर खाल्ले तर जेवणाची मजा काही निराळीच असते. rucha dachewar -
मटार पॅटीस (Matar patties recipe in marathi)
#matarभाग्यश्री लेले यांची मटार पॅटीस रेसिपी थोडा बदल करुन केली आहे,खूपच छान झाले आहेत पॅटीस.... Supriya Thengadi -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3आला थंडीचा महिना सुरू झाला फळभाज्यांचा महिमा.आहो थंडीत भरपूर भाज्या येतात. मटार तर भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे मटारचे असे अनेक पदार्थ खाता येतात आजचा पदार्थ आपण बनवणार आहोत मटार पॅटीस. Supriya Devkar -
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje -
मटारचे पॅटीस (Matar Patties Recipe In Marathi)
##LCM1बाजारात गेल्यावरती भरपूर हिरवेगार ताजे ताजे मटर दिसतात आणि थंडीच्या दिवसात मटरला खूप छान चव असते. मटारच्या खूप काही रेसिपी बनवता येतात.पराठे, पुलाव, ग्रेव्ही, सुकी भाजीईई. तर आज आपण बघूया मटारचे खुसखुशीत आणि चविष्ट पॅटीस. Anushri Pai -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week 3मधील गाजर या थीम नुसार रव्याचा उपमा गाजर आणि मटारचे दाणे टाकून करीत आहे.उपमा हा पचण्यास हलका असतो.गाजर आणि मटार टाकल्यामुळे उपमा खूप पौष्टिक लागतो. rucha dachewar -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#W3# मटार पॅटीस विंटर स्पेशल चॅलेंज मध्ये सगळ्यांनी खूप छान छान मटार पॅटीस ची रेसिपी बनवल्य आहेत. मी बनवला आहे पण थोडं वेगळं म्हटलं पॅटीस म्हटले की फ्राय किंवा शॅलो फ्राय पण मी१ टिस्पून तेल यापेक्षाही कमी असा एअर फ्रायर मध्ये मटार पॅटीस बनवलाय नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
पातीच्या कांद्याचा झुणका (patichya kandyacha jhunka recipe in marathi)
#GA4 #week11#पातीच्या कांद्याचा झुणका#पातीचा कांदा हा keyword नुसार पातीच्या कांद्याचा झुणका करत आहे. बेसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत,मेथी,काकडी, कांद्याचा,कोबी, सिमला मिरची पासून बेसन बनवता येते.हिवाळ्यात पातीचा कांदा सहज उपलब्ध होतो त्यामुळे पातीच्या कांद्याचा झुणका करत आहे.भाकरी आणि ठेचा सोबत खूप छान लागतो. rucha dachewar -
मेथीचे हिरव्या दाण्यांचे वडे (methiche hirvya dananche vade recipe in marathi)
#GA4 #week19 मेथीची भाजी टाकलेले हिरव्या दाण्याचे पौष्टिक वडे खाण्याची मजा वेगळीच आहे . Dilip Bele -
उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
#EB15 #Week15विंटर स्पेशल चैलेंजपॅटीस म्हटले की इंदूर आठवत पहले सराफा मधलं विजय चाट यांचं बटाट्याचे पॅटीस खाऊन कोणी येणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच आज मी उपवासासाठी हे पॅटीस केलाय. मी राजगिऱ्याचे पीठ बाइंडिंग साठी वापरलेला आहे. चेंज एकत्र राजगिऱ्याचे पीठ वापरून तयार केलेले आहे आणि डिफ्राय नाही केल. अगदी २ टिस्पून तेलात मस्त पॅटीस तयार. Deepali dake Kulkarni -
उपवासाचे खुसखुशीत पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टउपवास म्हंटला कीं , पदार्थांत काहीतरी नाविन्य असायलाच हवं , तरच घरी ते चवीने खाल्लं जातं . म्हणून चटकन होणारे , उपवासाचे मस्त ,चटकदार, कुरकुरे पॅटीस मी बनविले आहेत .चला ,शिवरात्रीच्या उपवासाचा आस्वाद घेऊ या .आता आपण त्याची कृती पहा Madhuri Shah -
गाजराचे आप्पे (gajarache appe recipe in marathi)
हिरव्या मुगाच्या डाळीचे डोस्याचे बॅटर ,शिल्लक होते. शिल्लक राहिलेल्या बॅटर, मध्ये भिजलेले चणे,कांदे,मिरच्या कोथिंबीर टाकून आप्पे . केले आहेत.नॉन स्टिक आप्पे पात्रावर मध्ये अप्पे केले आहे.डाळी मध्ये प्रोटीन असते आणि चण्यामध्ये फायबर असतो..बिना तेलाचे पौष्टिक नाश्ता खूप छान वाटतो. rucha dachewar -
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#week3#विंटर स्पेशल रेसिपी#मटार पॅटीसहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटर बाजारात उपलब्ध असतात त्यात चमचमीत आणि पौष्टीक खाण्यासाठी खास रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मटार पॅटीस (शॅलोफ्राय) (mutter patties recipe in marathi)
ही रेसिपी खुप कमी तेलात करता येते म्हणून खुप चांगली नि चवीला छान लागते .पण कमी तेल टाकले कि थोडा वेळ लागतो पॅटीस व्हायला.लहानमुलासाठी भाज्या लपवण्यासाठी छान आहे रेसिपी. चला तर बघा कशी करायची रेसिपी. Hema Wane -
खारी पॅटीस (Khari Patties Recipe In Marathi)
#PR पार्टीसाठी घरच्या घरी बनवता येईल असे छान पैकी खारी पॅटीस.😊 Padma Dixit -
उपवासाचे पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेपॅटीस#पॅटीस Chetana Bhojak -
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
पातीच्या लसणाचे आयते (patichya lasnache aayte recipe in marathi)
पातीच्या लसणाचे आयते करत आहे. हिवाळ्यात पातीचा लसूण सहज उपलब्ध होतो. पातीच्या लसणामध्ये नवीन तांदूळ टाकून आयते केले आहे. rucha dachewar -
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
आलु(बटाटा)पॅटीस (aloo batata patties recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrr उपवासाचा आलु (बटाटा) पॅटीस नवराञी च्या मुहूर्तावर २०१वी रेसिपीनवराञी चे उपवास आज पासून सुरू झाले हा एक असा उत्सव आहे ,की हा उपवास प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात.मी आज मला उपवासाला चालतील असे आलु पॅटीस केले. Suchita Ingole Lavhale -
चीज मटार पॅटीस(लो ऑईल रेेेसिपी) (cheese matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात येणारी अजून एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे वाटाणा(मटार). मटार दाणे अनेक भाज्यांच्या बरोबर एकत्र करून खूप सुंदर पदार्थ आपण तयार करू शकतो. बहुतेक करून सर्वांनाच मटार आवडतात. आजचे मटार पॅटीस बनवताना मुलांच्या आवडीचे चीज त्यात घातले आहे. त्यामुळे मटार पॅटीस ची चव अजूनच वाढली आहे. या मटार पॅटीस मध्ये मी ब्रेड, मैदा न वापरता फक्त बटाटा, तांदूळ पीठ, कॉर्न फ्लोअर, रवा चा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
चिझी पॅटीस (Cheese Patties Recipe In Marathi)
#SDR#काहीही मसाले न वापरतासुद्धा कटलेट फारच सुंदर होता. गरमीच्या दिवसातुन खाल्ले तर ऍसिडिटीचा त्रास होतो. मसाले न वापरता तयार केलेलं टेस्टी कटलेट...... Purva Prasad Thosar -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
मिक्स व्हेजिटेबल स्वीट कॉर्न पॅटी (mix vegitable sweetcorn patty recipe in marathi)
#GA4 #week8 #स्वीट कॉर्नपॅटीस हा पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो नाश्त्यासाठी एक छान पर्याय आहे आज मी जे स्वीट कॉर्न पॅटिस केले आहेत त्यामध्ये आपल्या घरी असलेल्या कुठल्याही भाजीचा वापर तुम्ही करू शकता. खाण्यासाठी रुचकर आणि तब्येतीसाठी हेल्दी अशीही रेसिपी आहे जी पंधरा ते वीस मिनिटात होऊ शकते.Pradnya Purandare
-
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar
More Recipes
- झणझणीत कोल्हापुरी मटण खिमा (mutton kheema recipe in marathi)
- ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
- पातीच्या कांद्याचा झुणका (patichya kandyacha zhunka recipe in marathi)
- डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
- शिमला मिरची, टोमॅटो, वाटाणा उपमा(upma) (shimla mirch tomato vatana upma recipe in marathi)
टिप्पण्या