#भोपळी_मिरचीचे_पंचामृत♥️🌿🥘

समृध्द कोकणखाद्यसंस्कृतीतील हा आणखी एक अप्रतिम पदार्थ. भाजीपेक्षा चटणी सारखा थोडासा वाढला जातो आणि तोंडी लावणे सारखा खाल्ला जातो. आंबटसर, गोड, तिखट अशा भन्नाट मिश्र चवीचा पंचामृत, हा महाराष्ट्रीयन घरी बनवला एक पारंपरिक मराठमोळा पदार्थ आहे. पुरणपोळी-कटाची आमटी ह्याबरोबर भोपळी मिरचीचे पंचामृत अगदी चविष्ट लागते.🥜🥥🌶️🍲🌿
लग्नानंतर माझी पहिलीच वेळ होती सत्यनारायणाची पुजेला बसण्याची आणि पुजेच्या दिवशीच्या अभीकडच्या रिती, जेवणाच्या पध्द्ती, प्रसादाचे प्रमाण अनुभवायची. साग्रसंगित पुजा झाल्यावर, तितकाच साधा मेन्यु असलेला, तरीही परिपुर्ण सात्विक नैवेद्यासाठीचा कांदा-लसूण-विरहीत स्वयंपाक बनवण्यावर आईचा कल असतो. 🤷😊
पुरणपोळी, कटाची आमटी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, कडव्या वालाची उसळ, लोणची, पापड, चटणी, कोथिंबीर वडी अशा पदार्थांच्या यादीत भोपळी मिरचीचे पंचामृताची पहिल्यांदा ओळख झाली. दिसण्यात हा पदार्थ उजवा नसला तरीही चवीमधे मात्र अव्वल गुण बरे का! :)💁
आतापर्यंत मला फक्त देवपुजेसाठी बनवण्यात येणारे दुध-दही-साखर(गुळ)-मध-तुप हे एकमेव पंचामृत माहित होते. पण हे पंचामृत ही मनात आवडीने सामावले त्या अफलातून चवीमुळे... शुभकार्यासाठी घरी पुरणपोळीचा घाट घातला कि आमच्याकडे हमखास पंचामृत बनवले जाते. 🥘🌿♥️
भोपळी मिरची, शेंगदाणे, खोबरे, काजू आणि मनूका हे महत्वाचे पाच घटक पंचामृतमधे असतात. पण त्यामुळे ह्या पदार्थांला पंचामृत म्हणतात कि काही जण म्हणतात त्याप्रमाणे ह्यामधे पाच वेगवेगळ्या चवी अनुभवायला मिळतात म्हणून पंचामृत संबोधतात ह्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. कुणाला माहित असल्यास त्याबाबत आम्हाला सांगितले तर आनंद होईल.🤷♥️

Steps
- 1
१. एका कढईमध्ये अख्खे धणे, जीरे, तीळ आणि खसखस हलकेच भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची मिक्सरवर पुड करा.
२. त्याच कढईत तेलावर ओले खवलेले खोबरे परतून घ्या. आणि आधीच बनवलेल्या पुडमधे मिसळून मिक्सरमधे बारीक करून घ्या.
३. कढईमधे तेल किंवा साजूक तूप गरम करा. त्यावर राई आणि हिंगाची फोडणी देऊन तडतडवा. - 2
४. हिरव्या मिरचीचे तुकडे फोडणीवर टाकून परतून घ्या. आणि मिक्सरमधे बारीक केलेली खोबरे आणि अख्ख्या मसाल्याची पुड टाकून परता. चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर तसेच गोडा मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकून परता. सगळे व्यवस्थित शिजू द्या.
५. सगळे व्यवस्थित परतले कि त्यात भोपळी मिरचीच्या बिया काढून, भोपळी मिरची चे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, काजूचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि बेदाणे टाकून परतून घ्या. बेदाणे छान टम्म फुलतात. :) - 3
६. दहा मिनिटांनंतर चिंचेचा कोळ आणि खिसलेला गुळ टाकून मिक्स करा. अजून दहा-पंधरा मिनिटे वाफेवर शिजू द्यावे.
झाले कि तय्यार आगळेवेगळे पंचामृत तयार!
पुरणपोळीसोबत खास आस्वाद घेता येतो पंचामृतचा पण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील छान जमते पंचामृतचे! बनवणार ना मग लवकरच?! - 4
काही छोट्या-मोठ्या टिप्स:
१. तेलापेक्षा अर्थातच साजूक तुपाची फोडणी सुरेख चव देते.
२. भोपळी मिरची गावठी मिळाल्या तर उत्तमच. Bell pepper म्हणजेच पिवळ्या, नारिंगी आणि लाल भोपळी मिरच्यांचे गंमत म्हणून किंवा सादरीकरण करण्यासाठी वापर करण्यास हरकत नाही. पण गावरान किंवा नेहमी मिळणा-या भोपळी मिरची उत्तम. - 5
३. फोडणीसाठी कढीपत्ता आणि सजवणूकीसाठी कोथिंबीर चा वापर जाणूनबुजून टाळला आहे. कारण आज्जी च्या मते कढीपत्ता किंवा कोथिंबीर चे स्वाद मुळ चवीसाठी थोडेसे उग्र ठरू शकतात. पण तुम्हाला आवडत असल्यास वापर करण्यास हरकत नाही.
४. उकडलेल्या शेंगदाणे च्या जागी भाजलेले शेंगदाणे हलकेच मिक्सरमधे एकदाच फिरवून वापरू शकता.
Similar Recipes
More Recipes
-

ifuchi
-

Pinkblanket's Kitchen
-

Sarvat Hanif
-

Madhumita Bishnu
-

Jigisha Modi
-

blackreafs -

Amazing Grace’s (aka TeenChef)
-

ryandvy
-

crissy3622 -

hoor
-

Palak Manghwani
-

Himanshi Agarwal -

#चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती')
Sneha Chaudhari_Indulkar
-

Harminder Kaur Sethi
-

sarita Sharma
-

#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️
Sneha Chaudhari_Indulkar
-

shimi
-

#भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗
Sneha Chaudhari_Indulkar
-

Mixed Vegetables Kabuli Chana Pulao
Krishna Biswas

Comments