#भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗

भरली भेंडी हा भेंडीचा कुरकूरीत चविष्ट प्रकार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हिरव्यागार भेंडीमधे आंबट-गोड मसाला स्टफिंग उत्तम लागते.
आमच्या मामाकडे दिड दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात, तेव्हा नैवेद्य आणि सगळ्या मोठ्या कुटूंबाच्या पंगतीमधे वाढताना भरली भेंडी हा पदार्थदेखिल आवर्जून असतो. फक्त नैवेद्यासाठी भरताना कांदा व लसूण घालत नाहीत. चला तर मग बघुया कशी बनवायची भरली भेंडी!
#भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗
भरली भेंडी हा भेंडीचा कुरकूरीत चविष्ट प्रकार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हिरव्यागार भेंडीमधे आंबट-गोड मसाला स्टफिंग उत्तम लागते.
आमच्या मामाकडे दिड दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात, तेव्हा नैवेद्य आणि सगळ्या मोठ्या कुटूंबाच्या पंगतीमधे वाढताना भरली भेंडी हा पदार्थदेखिल आवर्जून असतो. फक्त नैवेद्यासाठी भरताना कांदा व लसूण घालत नाहीत. चला तर मग बघुया कशी बनवायची भरली भेंडी!
Cooking Instructions
- 1
चला मस्त भेंडी भरायला घेऊया. तसेच भरली वांगी पण बनवायची असल्यास अगदी लहान काळी चकचकित वांगी घ्या.
तर भरल्या भेंडीसाठी, सर्व भेंडी स्वच्छ घुवून आणि नीट पुसून घ्या. भेंडीची देठं कापून, त्यांना क्राॅस मधे दोन चिरा द्यावा पण दोन तुकडे करू नये.
- 2
मग एका कढईत तेल गरम करून, राई, जीरा व हिंगाची फोडणी करावी. मग कढीपत्ता, कांदा, आलेलसूण वाटण, बेसन, गुळ, शेंगदाणा कुट, खवलेले खोबरे, चिंच पाणी आणि भेंडी सोडून उरलेले सर्व पदार्थ तेलावर हलकेसे भाजून घ्या.
मग हे मिश्रण थंड होऊ द्या. आणि एक एक करून प्रत्येक भेंडीमधे मिश्रण भरून घ्या. भेंडी गोलाकार सर्व बाजूने दाबून घ्या.
- 3
मग परत एक खोलगट पॅन घ्या. ब-यापैकी जास्त तेल टाकून गरम करा. राई, जीरे व हिंगाचा तडका द्या. मग एक एक करून भरलेला मसाला बाहेर पडू न देता भेंडी तेलामधे सोडा व व्यवस्थित तळून घ्या. थोड्या थोड्या वेळाने भेंडी सर्व बाजूंनी फिरवून शिजवत तळा.
मस्त तयार भरली भेंडी भाकरी किंवा चपातीसोबत गरमागरम सर्व्ह करा. वरण-भातासोबत देखिल खुप छान लागतात.
#भरली_भेंडी #stuffed_bhindi #laxmi_masale_edwan #maharashtrian_spice_blends #the_masala_bazaar
Cooksnaps
Did you make this recipe? Share a picture of your creation!
Similar Recipes
-
निनावं निनावं
निनावं म्हणजे ज्याला नाव नाही. हा गोडाचा पदार्थ सी. के. पी लोकां मध्ये श्रावणात दाट्याच्या दिवशी बनवतात. मी माझ्या मामी कडून हे बनवायला शिकले. ती हे अप्रतिम बनवते. माझ्या नवर्याला आणि मुलाला हा सीकेपी ऑथेंटीक पदार्थ खूपच आवडतो. आता तर मलाही तो परफेक्ट जमू लागलाय. म्हणूनच इतक्या आनंदाने ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. हॅपी कुकिंग/बेकिंग टू यू ऑल. पूजा कोर्डे -
#चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती') #चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती')
आमच्याकडे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधी सुक्के चिकन, मटण किंवा सुक्या मासळीचे प्रकार बनवले कि भातावर घ्यायला वरण, डाळ वैगरे प्रकार केले जात नाहीत तेव्हा झटपट चटपट होणारी चिंचेची चिंचकढी भातावर घेऊन खायला जबरदस्त लागते आणि हे सार अगदी पटकन होते.ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी.विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी करण्यात माहिर आहेत.आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत. नंतर लवकरच कच्च्या साराची रेसिपी देते.मुळातच कोकम (आमसुले) किंवा लिंबाच्या तुलनेत आम्हा वाडवळांच्या जेवणात चिंचेचा वापर जास्त केला जातो. माकूणसार, शिरगाव, अलिबाग भागात छान मीठाचे खडे लावून बनवलेले काळ्या उत्कृष्ट दर्जाची, चिंचोके आणि दोरे काढून साफ केलेली चिंच मिळते.पुर्वीच्या काळी कोठीच्या म्हणजेच साठवणूकीच्याअंधा-या खोलीत मोठेमोठे मातीचे घडे असत त्यात हे चिंचेचे गोळे वर्षभरासाठी भरून ठेवले जात. लहानपणी गुरगुट्या गाभुळलेल्या चिंचा खायला मज्जा यायची, मोठे होत गेलो तसे चिंचेचा एक चिंचकढी सोडली तर फारसा संबंध राहीला नाही. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो. 🍛🍲🌿तसेच आम्हा काही वाडवळांमधे चिकन किंवा मटणामधे बटाट्याच्या फोडी टाकतात. मटणाच्या खड्याइतक्याच आवडीने रस्सा मुरलेल्या बटाट्याच्या फोडी चिंचकढी भाताबरोबर ताव मारून खाल्ल्या जातात.माझी सुगरण मामी उत्तम चिंचकढी बनवते म्हणून ही रेसिपी तिच्याकडून खास घेतली आहे. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते. Sneha Chaudhari_Indulkar -
#भोपळी_मिरचीचे_पंचामृत♥️🌿🥘 #भोपळी_मिरचीचे_पंचामृत♥️🌿🥘
समृध्द कोकणखाद्यसंस्कृतीतील हा आणखी एक अप्रतिम पदार्थ. भाजीपेक्षा चटणी सारखा थोडासा वाढला जातो आणि तोंडी लावणे सारखा खाल्ला जातो. आंबटसर, गोड, तिखट अशा भन्नाट मिश्र चवीचा पंचामृत, हा महाराष्ट्रीयन घरी बनवला एक पारंपरिक मराठमोळा पदार्थ आहे. पुरणपोळी-कटाची आमटी ह्याबरोबर भोपळी मिरचीचे पंचामृत अगदी चविष्ट लागते.🥜🥥🌶️🍲🌿लग्नानंतर माझी पहिलीच वेळ होती सत्यनारायणाची पुजेला बसण्याची आणि पुजेच्या दिवशीच्या अभीकडच्या रिती, जेवणाच्या पध्द्ती, प्रसादाचे प्रमाण अनुभवायची. साग्रसंगित पुजा झाल्यावर, तितकाच साधा मेन्यु असलेला, तरीही परिपुर्ण सात्विक नैवेद्यासाठीचा कांदा-लसूण-विरहीत स्वयंपाक बनवण्यावर आईचा कल असतो. 🤷😊पुरणपोळी, कटाची आमटी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, कडव्या वालाची उसळ, लोणची, पापड, चटणी, कोथिंबीर वडी अशा पदार्थांच्या यादीत भोपळी मिरचीचे पंचामृताची पहिल्यांदा ओळख झाली. दिसण्यात हा पदार्थ उजवा नसला तरीही चवीमधे मात्र अव्वल गुण बरे का! :)💁आतापर्यंत मला फक्त देवपुजेसाठी बनवण्यात येणारे दुध-दही-साखर(गुळ)-मध-तुप हे एकमेव पंचामृत माहित होते. पण हे पंचामृत ही मनात आवडीने सामावले त्या अफलातून चवीमुळे... शुभकार्यासाठी घरी पुरणपोळीचा घाट घातला कि आमच्याकडे हमखास पंचामृत बनवले जाते. 🥘🌿♥️भोपळी मिरची, शेंगदाणे, खोबरे, काजू आणि मनूका हे महत्वाचे पाच घटक पंचामृतमधे असतात. पण त्यामुळे ह्या पदार्थांला पंचामृत म्हणतात कि काही जण म्हणतात त्याप्रमाणे ह्यामधे पाच वेगवेगळ्या चवी अनुभवायला मिळतात म्हणून पंचामृत संबोधतात ह्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. कुणाला माहित असल्यास त्याबाबत आम्हाला सांगितले तर आनंद होईल.🤷♥️ Sneha Chaudhari_Indulkar -
#pe# अंडा घोटाला #pe# अंडा घोटाला
#pe अंडा घोटालाआओ सिखाओ तुम्हे अंडा घोटाला 😁😁अंड खूप पौष्टिक,प्रथिन्यांनी परिपूर्ण,good cholesterol वाढविणारा,omega 3 fatty acids च स्त्रोत ,आणि मुख्यतः वजन कमी करायला मदत करणारा असा हा ...रोजच्या आहारात त्याचा समावेश व्हायला हवा असे हल्ली सगळेच आहारतज्ञ सुचवतात। ऑमलेट,भूरजी,अंडा करी खाऊन कंटाळा आलाय...म्हणून आज जरा वेगळा प्रकार try केलाय..बघूया त्याची कृती Rashmi Joshi -
#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️ #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️
#चटकदार_लोणची ♥️🌿🍲बाजारात सध्या मुबलक ओली हळद, ताजी आंबेहळद, रसदार लिंबे, चांगले पक्व आले, हिरव्यागार मिरच्या आणि उत्कृष्ट रानआवळे उपलब्ध झाले आहेत. 👩🍳🌶️🍋🌶️🍋🥕🥘🌶️त्यामुळे आता वेळ आली आहे 'आंबेहळद-ओली हळद-आले-मिरची-आवळा-लिंबू' लोणचे बनवण्याची!!! 🤷♥️🌿 अगदी भन्नाट लागते चवीला आणि सोपे आहे बनवायला....😃 आई रश्मी इंदूलकर ची ही पाककृती आहे. सकाळी गावरान साहित्य तीच हुडकून आणते बाजारातून... 😃💁लोणचे मसालेचा वापर करून अनेक सुगरणींनी, नवख्या स्वयंपाक करणा-या युवतींनी आणि कैक हौशी Home-chef नी, जेवणाची रंगत वाढवणारी आणि वाढलेल्या पानांची डावी बाजू सांभाळणा-री अशी त-हेत-हेची चविष्ट, चमचमीत आणि लज्जतदार लोणची बनवली. कैरीचे, मोक्याचे, लिंबाचे, करवंदाचे, मिरचीचे, माईनमुळ्याचे, गाजराचे, आवळ्याचे आणि अजूनही बरीच लोणची हा एकच लक्ष्मी मसालेचा तयार लोणचे मसाला वापरून झटपट बनवता येतात. :)तो मसाला आयत्या वेळी मिळाला नाही तरी घरच्याघरी व बनवता येईल असे मसाल्याचे प्रमाण दिले आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. 🤷🌿💁♥️ तसेच हाच मसाला वापरून, लिंबू आणि १२ ही महिने मिळणा-या आंब्याच्या कै-यांचे लोणचे घालू शकता. :) Sneha Chaudhari_Indulkar -
♦️#संक्रांत_विशेष कडक_तीळ_वडी ♦️#संक्रांत_विशेष कडक_तीळ_वडी
♦️ही वडी कमी साहित्यात आणि पट्कन होतेंकुरकुरीत व चविष्ट लागते P G VrishaLi -
सुपर फूड राजगिरा लाडू#उपवास_स्पेशल🟡राजगिरा लाडू🟡 सुपर फूड राजगिरा लाडू#उपवास_स्पेशल🟡राजगिरा लाडू🟡
🟡 राजगिऱ्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदय आणि पचनक्रिया यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो. राजगिर्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.यामध्ये जीवनसत्त्व सी असल्याने त्वचा, केस यासाठी उपयुक्त आहे.राजगिरा लाडू ही एक पारंपरिक पाककृती आहे, जी राजगिरा आणि गूळ वापरून बनवतात. हे लाडू पौष्टिक असतात आणि उपवासासाठी चालू शकतात. P G VrishaLi -
🟡#संक्रांत_विशेष🟡#गोड_धोड🟡गुळपोळी. 🟡#संक्रांत_विशेष🟡#गोड_धोड🟡गुळपोळी.
🟡खमंग खुसखुशीत गुळपोळी सर्वानाच आवडतेविशेषतः थंडीच्या दिवसात गुळपोळी पौष्टिक पण असतें आणि चविष्ट लागतेसंक्रांत आणि गुळपोळी याचे एक खास नाते आहेप्रत्येकाची गुळ पोळी करायची वेगवेगळी पद्धत असतेही माझ्या पद्धतीची गुळपोळी 😊 P G VrishaLi -
#DR2………वन मिल डिनर थालीपीठ रेसीपी One meal dinnar - thalipith recipe #DR2………वन मिल डिनर थालीपीठ रेसीपी One meal dinnar - thalipith recipe
नेहमी आपण कांदा थालीपीठे करतो. मी येथे पौष्टिक मिश्र भाज्या व मिश्र पिठाचे वन मील थालिपीठ बनवले. खूपच टेस्टी व खमंग लागतात. पाहूयात कसे बनवायचे … Mangal Shah -
#mango cranberry cake #mango cranberry cake
आंबा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून खायची मजा काही औरच आज मी घेऊन आलेय खास आंबा क्रान्सबेरी रवा केक. व्हेज केक कोणी ही खाऊ शकते. Supriya Devkar -
More Recipes
Comments