#चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती')

आमच्याकडे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधी सुक्के चिकन, मटण किंवा सुक्या मासळीचे प्रकार बनवले कि भातावर घ्यायला वरण, डाळ वैगरे प्रकार केले जात नाहीत तेव्हा झटपट चटपट होणारी चिंचेची चिंचकढी भातावर घेऊन खायला जबरदस्त लागते आणि हे सार अगदी पटकन होते.
ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी.
विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी करण्यात माहिर आहेत.
आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत. नंतर लवकरच कच्च्या साराची रेसिपी देते.
मुळातच कोकम (आमसुले) किंवा लिंबाच्या तुलनेत आम्हा वाडवळांच्या जेवणात चिंचेचा वापर जास्त केला जातो. माकूणसार, शिरगाव, अलिबाग भागात छान मीठाचे खडे लावून बनवलेले काळ्या उत्कृष्ट दर्जाची, चिंचोके आणि दोरे काढून साफ केलेली चिंच मिळते.
पुर्वीच्या काळी कोठीच्या म्हणजेच साठवणूकीच्याअंधा-या खोलीत मोठेमोठे मातीचे घडे असत त्यात हे चिंचेचे गोळे वर्षभरासाठी भरून ठेवले जात. लहानपणी गुरगुट्या गाभुळलेल्या चिंचा खायला मज्जा यायची, मोठे होत गेलो तसे चिंचेचा एक चिंचकढी सोडली तर फारसा संबंध राहीला नाही. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो. 🍛🍲🌿
तसेच आम्हा काही वाडवळांमधे चिकन किंवा मटणामधे बटाट्याच्या फोडी टाकतात. मटणाच्या खड्याइतक्याच आवडीने रस्सा मुरलेल्या बटाट्याच्या फोडी चिंचकढी भाताबरोबर ताव मारून खाल्ल्या जातात.
माझी सुगरण मामी उत्तम चिंचकढी बनवते म्हणून ही रेसिपी तिच्याकडून खास घेतली आहे. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते.

Steps
- 1
१. बारीक उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ एका भांड्यात घेऊन जोर लावून कुस्करावे. 🥗🍵
२. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यामधे तेल गरम करा. लगेचच अगदी थोड्याशा राई जीरा-हिंगाची फोडणी करा. त्यात हे कुस्करलेले मिश्रण आणि आले-लसूण परतवा, थोडेसे शिजवा आणि चिंचेचे पाणी आणि गुळ टाका.
३. मस्त उकळी येऊ द्या आणि बघा ही चटपटीत चिंचकढी झालीसुध्दा तय्यार.🍵🌶️🌿 - 2
गावी आवणी/ रोपणी च्या शेवटच्या दिवशी काही मालक हौसेने चिकन रस्सा देतात आवणी मजुरांना तेव्हादेखील भातावर वाढायला आवर्जून चिंचकढी बनवतात. Combination अगदी झक्कास लागते बघा!
काहीवेळा लग्नातील तिखटजेवणावेळी सुक्के चिकन, मटण रस्सा, चिकन तंदूरी, भातासोबत चिंचकढी ठेवतात. सुके मासे वापरून केलेल्या पदार्थांनाही चिंचकढी उत्तम चविष्ट साथ देते.
तुम्हीदेखील सहज म्हणून करून खाऊन पहाच! :) 🤷👩🍳#tamarind #tamarind_saar #tamarind_indianfood #food #indianfood #maharashtrian_food #chinch #chinchkadhi
Similar Recipes
More Recipes
-

Mixed veg masala vermicelli (namkin sevai)
Sudha Agrawal
-

Veg Masala Maggi (Mumbai Street Style)
Daxa Parmar
-

Seema Sharma
-

Shobha Rathod
-

Rachana Sagala
-

Yadnya Desai
-

Yadnya Desai
-

Western Steak Tartare - (James McNair's Beef Cookbook)
Cluelesskitty
-

Elyse Rose
-

blackreafs -

Amazing Grace’s (aka TeenChef)
-

ryandvy
-

crissy3622 -

Katherine
-

hoor
-

Palak Manghwani
-

Himanshi Agarwal -

Harminder Kaur Sethi
-

Sneha Chaudhari_Indulkar
-

sarita Sharma
-

#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️
Sneha Chaudhari_Indulkar
-

shimi

Comments