रव्याचे उकडीचे मोदक

#goldenapron3
#week4
# rava
आपण बाप्पासाठी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवितो ते व्यवस्थित उकड काढली गेली नाही तर फुटतात किंवा कडक होतात. पण रव्याची उकड काढून केलात तर दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मऊ राहतात आणि चवीलाही छान लागतात. म्हणून मी रव्याच्या उकडीचे मोदक बनविते, तुम्हीही करून बघा...
रव्याचे उकडीचे मोदक
#goldenapron3
#week4
# rava
आपण बाप्पासाठी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवितो ते व्यवस्थित उकड काढली गेली नाही तर फुटतात किंवा कडक होतात. पण रव्याची उकड काढून केलात तर दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मऊ राहतात आणि चवीलाही छान लागतात. म्हणून मी रव्याच्या उकडीचे मोदक बनविते, तुम्हीही करून बघा...
Steps
- 1
सारणासाठी : खसखस थोडी भाजुन घ्या नंतर त्यातच गुळ, खोबरे टाकून शिजवा. मी मायक्रोवेव्ह मोडवर ५-६ मिनिटे शिजवते
- 2
गुळ चांगला मिक्स झाला की थोडं सुकं दिसतं मग वेलचीपूड टाका. हे सारण तयार झाले.
- 3
पारीसाठी : भांड्यात पाणी, मीठ, तूप १ च, दूध टाकून चांगली उकळी काढा
- 4
उकळी आली की गॅस मंद ठेवून रवा टाका व सतत ढवळत रहा. झाकण ठेवून २ मिनिटे वाफवा. छान मऊ होईल.
- 5
परातीत उकड काढून पेल्याच्या मागच्या बाजूला तूप लावून पेल्याने रगडून गुठळ्या मोडा.
- 6
हाताला तूप लावून छान मळून घ्या. गोळे करा.
- 7
पारी बनवून सारण घालून मोदक बनवा. वाफवायला ठेवताना पाण्यात बुडवून मोदक चाळणीत ठेवा.
- 8
१० मिनिटे वाफवून घ्या.
- 9
मस्त लुसलुशीत मोदक तयार
Similar Recipes
More Recipes
-

Nargis shaikh Shaukat
-

Deepti Johri
-

Muniswari.G
-

Ananthi @ Crazy Cookie
-

Bee Vinitra
-

Swati Sheth
-

Foram C. Virani
-

Prachi Maheshwari
-

Jibita Khanna
-

Air Fry with Me
-

cook 1
-

Cabbage with Beef and Potatoes
skunkmonkey101
-

Spencer Tetz
-

Amber Fawad
-

Rekha Rathi
-

Jasmin Motta _ #BeingMotta
-

Greeny dhokla (spinach and guava flavoured) from leftover roties
Pia Dharmin Thacker
-

Deepa Rupani
-

Sneha Shah
-

Sushree Satapathy
-

Hemangi Chaudhary
-

Soni S
-

Quinoa Flatbread (Can be cut into crackers)
Spencer Tetz



















Comments (2)