आवळ्याचे च्यवनप्राश

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#myfirstrecipe

#आवळ्याचेच्यवनप्राश

थंडीची चाहुल लागली की काहीतरी पौष्टिक पदार्थ करणे ओघाने आलेच...आज जवळपास दोन किलो आवळे आणले(आमच्या धनीला जास्त प्रमाणात सामान आणायची हौस दुसरे काय !)
एक किलो आवळ्याचे लोणचे केले...एक किलो आवळ्याचे च्यवनप्राश केले...पहिल्यांदाच केले बरे हे च्यवनप्राश...चव तर फारच अफलातून असे आमच्या पुत्राने सांगितले बरे...मग काय , इतका वेळ केलेल्या श्रमाचे चीज झाले अशी दाद मिळाल्यावर, तुम्हालाही असेच होते का ?....अर्चना शेवडे

ता.क---फोटोसोबत कृती व प्रमाण दिले आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2तेजपत्ता, चार लवंग,१ चमचा जीरे, सर्व बारीक करणे
  2. १ चमचा प्रत्येकी लेंडी पिंपरी पावडर, सुंठ पावडर, दालचीनी पावडर, विलायची पावडर, केशर
  3. मुठभर बदाम व दोन चमचे खारीक पावडर बारीक करणे
  4. १५-२० लेंडी पिंपरी घेऊन पावडर बनवणे
  5. जेवढा आवळ्याचा कीस तेवढी साखर
  6. 1चमचा तुप
  7. 1 किलोआवळे

कुकिंग सूचना

  1. 1

    आवळे धूवून स्टिलच्या कुकरमध्ये पाणी टाकून ६ शिट्यात शिजवणे.शिजल्यावर पाणी निथळू देणे

  2. 2

    आवळे कीसून घेणे.एका भांड्यात १मोठा चमचा तुपात किस परतणे.लेंडी पिंपरी घेऊन पावडर बनवणे

  3. 3

    जेवढा कीस तेवढी साखर मिसळणे

  4. 4

    लेंडी पिंपरी पावडर, सुंठ पावडर, दालचीनी पावडर, विलायची पावडर, केशर मिसळणे

  5. 5

    मुठभर बदाम व दोन चमचे खारीक पावडर बारीक करुन मिसळणे

  6. 6

    मिश्रण घट्ट होत आलेकी दोन तेजपत्ता, चार लवंग,१ चमचा जीरे, सर्व बारीक करुन मिश्रणात मिसळणे

  7. 7

    साधारण पुरण करतो तसे घट्ट शिजवणे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes