खजूराचे झटपट पौष्टीक लाडू

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#फ्रुट

खजुराचे झटपट पौष्टिक लाडू

दोन टिफीन असेल तर मी शक्यतो पौष्टिक व पोटभरीचे लाडू देते. आज मी मुलासाठी खजुराचे झटपट होणारे पौष्टिक लाडू केले.घरात असलेले सुकामेवा , खजुर वापरुन केले.फक्त खजुर मी तुपात भाजून घेतले तेही १ च तुपात(बिया काढुन). बाकीचे जिन्नस कोरडे भाजून घेतले.
किशमिश न भाजता घ्या.सर्व थंड झाल्यावर वेगवेगळे मिक्सरवर बारीक करा.नंतर एकत्र करतांना विलायची पुड व जायफळ पुड टाका. मस्त मळुन ३०मि झाकुन ठेवा. नंतर लाडू वळा.
सजावटीसाठी मी डेसीकेटेड कोकोनट पावडर व multicolour sprinkles वापरले.खजुराच्या नैसर्गिक गोडसरपणामुळे साखर/गुळ वापरायची गरज पडतच नाही.मुलासोबत मोठेसुद्धा आवडीने खातील हे लाडू.
-- अर्चना शेवडे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2 tbspचारोळी
  2. 4 tbspतिळ
  3. 4 tbspकिशमीश/ बेदाणे
  4. 6 tbspबदाम
  5. 2 tbspपिस्ता
  6. 4 tbspकाजू
  7. 4 tbspशेंगदाणे
  8. 4 tbspखारीक पावडर
  9. 1 tbspविलायची पावडर
  10. 1tsp जायफळ पुड
  11. 1 tbspसाजुक तुप
  12. 500gram काळे मऊ खजूर

कुकिंग सूचना

  1. 1

    खजूर तुपात भाजले

  2. 2

    बाकीचे जिन्नस कोरडे भाजून पुड केली. किशमीश न भाजताच मिक्स करा.सर्व मिक्सरमध्ये फिरवून एकत्र करा.अर्धातास मुरु द्या व नंतर लाडू वळा.

  3. 3

    मी डेसीकेटेड कोकोनट वापरले सजावटीसाठी

  4. 4

    रंगीबेरंगी sprinkes वापरले.

  5. 5

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes