मावा पेढा

Pooja Pawar
Pooja Pawar @cook_21131969

नमस्कार मैत्रिणींनो 🙏
मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.
बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.
त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.
आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १

मावा पेढा

नमस्कार मैत्रिणींनो 🙏
मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.
बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.
त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.
आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ १/२ कप दूध पावडर,
  2. १ कप Amul Mithaimate,
  3. १/४ चमचा वेलची पावडर,
  4. १/८ चमचा खायचा पिवळा रंग,
  5. ३ चहाचे चमचे तूप,
  6. सजावटीसाठी बदामाचे किंवा pistyache काप

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती :- प्रथम एका कढईत २चमचे तूप घ्यावे.

  2. 2

    तूप थोडे गरम झाले की त्यामध्ये १कप Amul Mithaimate घालून ७-८ मिनिटे ढवळणे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये १ १/२ कप दूध पावडर व खायचा पिवळा रंग घालून मंद आचेवर चांगले ढवळत राहणे. परत थोडे तूप घालून ढवळणे.

  4. 4

    मिश्रण थोडे सुकत आले की त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून चांगले ढवळणे व गॅस बंद करणे.

  5. 5

    नंतर एका प्लेटला थोडे तूप लावून तयार मिश्रण प्लेटमध्ये काढणे. १०-१५ मिनिटे मिश्रण थंड होऊ देणे. जास्त गार करू नये.

  6. 6

    मिश्रण थोडेसे गरम असतानाच हाताला तूप लावून छोटे छोटे गोळे घेउन त्याला पेढयाचा आकार देणे व त्यावर सजावटीसाठी बदामाचे किंवा pistyache काप लावणे. प्रसादासाठी पेढे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Pawar
Pooja Pawar @cook_21131969
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes