पपई पुडिंग

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#lockdown, #stayathome, #workfromhome, #let'scook
फक्त दोन-तीन घटक पदार्थांनी तयार होणारा आणि न शिजवता तयार होणारा हा झटपट पदार्थ. काही वर्षांपूर्वी बनवली होती, पण मधल्या काळात स्मृतिआड गेलेली ही रेसिपी काल छाया पारधी यांच्या रेसिपीने पुन्हा आठवली.
# chhayaparadhi - inspired by her receipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. - मध्यम आकाराची पिकलेली पपई
  2. जरूर वाटल्यास आवश्यकतेनुसार पिठीसाखर
  3. अर्धा टिन - कंडेंस्ड मिल्क

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पपई सोलून, आतील बिया काढून घ्याव्यात. पपई सोलताना साल जरा जाडसरच काढावी, नाहीतर कडवटपणा येतो. बिया काढल्यावर खालील पातळ पापुद्राही काढून टाकावा.

  2. 2

    पपईच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये त्यांचा लगदा करावा. त्यात कंडेंस्ड मिल्क घालून पुन्हा मिक्सर फिरवून घ्यावा.

  3. 3

    पपई कमी गोड असेल तर किंवा आपल्या आवडीनुसार पिठीसाखर घालून मिक्स करावे.

  4. 4

    हे तयार मिश्रण आईस्क्रीमच्या साच्यात किंवा केकटीनमध्ये ओतून फ्रीजमध्ये थंड करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
व्वाव मस्तच👌
मी ट्राय करणार👍

Similar Recipes